मोठी बातमी! मुख्यमंत्री आतिशी कालकाजीमधून विजयी; निकराच्या लढतीत भाजपच्या बिधुरी यांचा पराभव
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. कालकाजी विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या मुख्यमंत्री आतिशी या विजयी झाल्या आहेत. भाजपचे माजी खासदार रमेश बिधुरी यांचा त्यांनी पराभव केला. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज सकाळपासून मतमोजणी सुरु झाली. त्यानंतर अनेक धक्कादायक निकाल हाती येऊ लागले आहेत.

आतिशी यांचा विजय
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार कालकाजीमध्ये भाजपचे रमेश बिधुरी व मुख्यमंत्री आतिशी यांच्यात जोरदार लढत झाली. काँग्रेसच्या अलका लांबा या पहिल्या फेरीपासून पिछाडीवर राहिल्या. १२ फेऱ्यांपैकी आठ फेरीनंतर रमेश बिधुरी व आतिशी यांच्यात २३८ मतांचा फरक होता. मतमोजणीच्या आठ फेऱ्यानंतर रमेश बिधुरी १९९१ मतांनी मागे पडले. त्यानंतर शेवटच्या फेरीपर्यंत त्यांना हे लीड तोडता आले नाही. हे लीड शेवटपर्यंत वाढतच गेले.












Click it and Unblock the Notifications