Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दिल्ली विधानसभा निवडणुकीत सपा-तृणमूलचा AAP ला पाठिंबा, काँग्रेस एकाकी; केजरीवालांचा हल्लाबोल

Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. 10 जानेवारीपासून आचारसंहिता लागणार असून 5 फेब्रुवारीला मतदान अन् 8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. तत्पूर्वीच इंडिया आघाडीत दिल्ली निवडणूकीत फूट पडल्याने दिसून आले आहे. कॉंग्रेस पक्ष एकाकी पडलेला असून 'आप'ला समाजवादी पार्टी व तृणमुलचा पाठिंबा मिळाला आहे. तर आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे पाठिंबा दिल्याबद्दल आभार देखील मानले.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी बुधवारी दिल्लीत आप आमची विरोधक असल्याचे सांगितले. केजरीवाल आपला पक्ष पुन्हा निवडणुका जिंकणार असा संभ्रम जनतेत पसरवत आहेत. या विधानाला केजरीवाल यांनी लगेचच प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसची छुपी युती आता उघड दिसून येत आहे.

केजरीवाल म्हणाले- सत्य बोलल्याबद्दल गेहलोतजींचे आभार

केजरीवाल म्हणाले- गेहलोत जी, तुम्ही स्पष्ट केले आहे की दिल्लीत आप काँग्रेसची विरोधक आहे. 'आप' हा काँग्रेसचा विरोधी पक्ष आहे आणि भाजप कॉंग्रेसचा साथीदार आहे, असे लोकांना वाटले. आतापर्यंत तुम्हा दोघांमधील हे सहकार्य गुप्त होते. आज तुम्ही ते सार्वजनिक केले. या स्पष्टीकरणाबद्दल दिल्लीच्या जनतेच्या वतीने मी तुमचा धन्यवाद मानतो, असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी गेहलोत यांच्या विधानाचा समाचार घेतला.

Delhi Assembly Election 2025

तीन पक्ष 'आप'सोबत, काँग्रेस पक्ष एकाकी पडला

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'ला समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना यूबीटीचा पाठिंबा मिळाला आहे. केजरीवाल यांनी पक्षाच्या नेत्यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. शिवसेनेचे यूटीबी नेते संजय राऊत म्हणाले की, भाजपने निवडणुकीपूर्वी प्रकल्प सुरू केले आणि नंतर 5 वर्षे काहीही केले नाही. दिल्लीतील जनता अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच आहे.

आप-कॉंग्रेस स्वबळावरच लढणार असल्याची घोषणा

साधारण महिनाभरापूर्वी दिल्ली निवडणुकीत आप आणि काँग्रेस यांच्या युतीबाबत अटकळ होती. त्यानंतर 11 डिसेंबर रोजी X वर पोस्ट करून अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते. काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारची युती होण्याची शक्यता नाही. काही दिवसांनंतर, 25 डिसेंबर रोजी काँग्रेस नेते अजय माकन यांनी दिल्ली काँग्रेसच्या वतीने आम आदमी पार्टी आणि भाजपविरोधात 12 कलमी श्वेतपत्रिका जारी केली. तेव्हा ते म्हणाले होते की, लोकसभा निवडणुकीसाठी आपसोबत युती करणे ही काँग्रेसची चूक होती, जी आता सुधारली पाहिजे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+