'भाडेकरूंना मोफत वीज आणि पाणी देऊ', अरविंद केजरीवालांची दिल्लीकरांसाठी मोठी घोषणा
Arvind Kejriwal: दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिल्लीकरांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. आता दिल्लीतील भाडेकरूंना मोफत वीज आणि पाण्याचा लाभ मिळत नाही. निवडणुकीनंतर आपचे सरकार स्थापन झाल्यावर, एक नवीन योजना आणली जाईल, ज्याअंतर्गत भाडेकरूंनाही मोफत वीज आणि पाणी मिळेल, असं आश्वासन केजरीवाल यांनी दिलं आहे.
केजरीवाल म्हणाले की, विशेषत पूर्वांचलमधील समाजाला या योजनेचा मोठा फायदा होईल.या योजनेद्वारे, भाड्याने राहणाऱ्या अनेक लोकांना सध्या फक्त घरमालकांना उपलब्ध असलेल्या सुविधा देखील मिळतीलं, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

केजरीवालांचा भाजपावर मोठा आरोप
आम आदमी पक्षावर बनवलेल्या 'अनब्रेकेबल' या माहितीपटाचे प्रदर्शन थांबवल्याचा आरोपही अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. त्यांनी म्हटले की, "भाजपने जाणूनबुजून या माहितीपटाचे प्रदर्शन थांबवलं आहे. केजरीवाल यांनी दावा केला की, "हा माहितीपट आज आयटीओमध्ये दाखवण्यात येणार होता, पण दिल्ली पोलिसांनी तो थांबवला आहे. हा राजकीय कार्यक्रम नव्हता तर पत्रकारांसाठी खाजगी स्क्रीनिंग होता. भाजप घाबरला आहे, हा माहितीपट बेकायदेशीरपणे थांबवण्यात आला ", असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
दिल्ली में रहने वाले हमारे लाखों किरायेदार भाई-बहनों के लिए महत्वपूर्ण घोषणा। https://t.co/RHWGIfrlwd
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 18, 2025
केजरीवालांच्या आरोपावर पोलिसांनी दिलं उत्तर
दरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना दिल्ली पोलिसांनी सांगितले की, "निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे, त्यामुळे राजकीय पक्षांना कार्यक्रम आयोजित करण्यासाठी परवानगीसाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्ज करावा लागेल. या कार्यक्रमासाठी निवडणूक आयोगाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती, जी एक निवडणूक नियमांचे उल्लंघन आहे." केजरीवाल यांच्या आरोपांनंतर आणि दिल्ली पोलिसांच्या प्रतिसादानंतर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची मागणी वाढली आहे.












Click it and Unblock the Notifications