'दिल्ली तुमची गुंडगिरी सहन करणार नाही', केजरीवालांची अमित शहा यांच्यावर टीका
Delhi Assembly election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलाचं तापलं आहे. दरम्यान आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पोलिसांवर कथितपणे 'आप' कार्यकर्त्यांचा 'छळ' केल्याचा आरोप केला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर पोलिसांच्या माध्यमातून 'आप' कार्यकर्त्यांचा 'छळ' केल्याचा आरोप केला आहे. भलेही गुजरातमध्ये आप कार्यकर्त्यांना तुमची "गुंडगिरी" सहन करावी लागली असली तरी दिल्ली अशा प्रकारचे वर्तन सहन करणार नाही. एवढेच नाही तर केजरीवाल यांनी सोशल मिडीया पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'अमित शाहजी पूर्णपणे संयम गमावून बसले आहेत.'

फोटो सौजन्य- पीटीआय
तुम्ही गुजरातमध्ये गुंडगिरी केली असेल, दिल्ली तुमची गुंडगिरी सहन करणार नाही
केजरीवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'अमित शाहजी खूप अस्वस्थ आहेत. अमितजी, तुम्ही गुजरातमध्ये गुंडगिरी केली असेल. दिल्ली तुमची गुंडगिरी सहन करणार नाही. त्याच वेळी ज्येष्ठ आप नेते संजय सिंह यांनी असा आरोप केला की पराभवाच्या भीतीमुळे भाजप पोलिसांचा वापर करून दिल्लीतील आप कार्यकर्त्यांना त्रास देत आहे.
अमित शाह जी बुरी तरह बौखला गए हैं। अमित जी, आपने गुजरात में गुंडागर्दी की होगी। दिल्ली आपकी गुंडागर्दी बर्दाश्त नहीं करेगी। https://t.co/8tWGk1hg30
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 22, 2025
भाजप निवडणुकीत वाईटरित्या पराभूत होत आहे
संजय सिंह यांनी ट्विटरवर पोस्ट केले की, "भाजप निवडणुकीत वाईटरित्या पराभूत होत आहे. पराभवाच्या भीतीने पोलिस आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत. दिल्ली पोलिस नियमांचे उल्लंघन करत आहेत. नवी दिल्ली विधानसभेच्या बीआर कॅम्पमधील आप कार्यकर्ते बंटी शेखावत यांच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत." "घरावर छापा टाकला जात आहे. @ECISVEEP @CPDelhi घटनेची दखल घ्या.", असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
एएनआयशी बोलताना आप खासदार संजय सिंह यांनी आरोप केला की, त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी "खोट्या तक्रारींच्या" आधारे ताब्यात घेतले आहे. ते म्हणाले की, नवी दिल्ली मतदारसंघात भाजपचा पराभव होणार आहे. जेव्हा प्रवेश वर्मा पैसे आणि इतर गोष्टी वाटतो तेव्हा आम्ही तक्रार केल्यानंतरही कोणतीही कारवाई केली जात नाही.
दिल्ली विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 5 फेब्रुवारीला मतदान
दुसरीकडे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध खोटी तक्रार दाखल करण्यात आली आणि त्या आधारावर त्यांना ताब्यात घेण्यात आले. अशा परिस्थितीत आपण प्रचार कसा करू शकतो? दिल्ली विधानसभेची निवडणूक 5 फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात होणार आहे आणि 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
दिल्ली विधानसभेतील 70 विधानसभा जागांसाठी एकूण 699 उमेदवार रिंगणात आहेत. गेल्या 15 वर्षांपासून दिल्लीवर सतत राज्य केल्यानंतर अलिकडच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. दरम्यान 'आप'ने 2015 आणि 2020 मध्ये मोठे विजय मिळवला होता.












Click it and Unblock the Notifications