दिल्ली एअरपोर्ट टर्मिनल 1 आजही बंद; अनेक उड्डाणे रद्द...प्रवाशांना मनस्ताप
दिल्ली: शुक्रवारी दिल्ली विमानतळावरून एक धक्कादायक घटना समोर आली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या समोरील टर्मिनल - 1 चे छत कोसळले. या दुर्भाग्यपूर्ण घटनेत 1 व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता. तर 4 ते 5 लोक या घटनेत गंभीररित्या जखमी झाले. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी पहाटे पाच वाजता सुमारास ही घटना घडली होती. अचानक छत कोसळल्याने अनेक गाड्या देखील या ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या.
टर्मिनल - 1 आज बंद, अनेक उड्डाणे रद्द:
सुरुवातीला टर्मिनल - 1 वरील उड्डाणे शुक्रवारी दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली होती. मात्र आता ही उड्डाणे पुढील सूचना येईपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने याबाबत माहिती कळवली आहे. या घटनेमुळे अनेक प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावं लागलं आहे.
#WATCH | Delhi International Airport Limited (DIAL) suspended flight operations from Terminal 1 till further notice following yesterday's canopy collapse incident in which one person was killed and eight others were injured.
— ANI (@ANI) June 29, 2024
(Visuals from outside Terminal 1) pic.twitter.com/ausadD7GDa
विशेषत दिल्लीतील या घटनेचा परिणाम मुंबई विमानतळावरील उड्डाणवरही झालं आहे. काही रात्रीच्या वेळी उड्डाण करणारी विमाने अद्यापही विमानतळावर असल्याची माहिती समोर येत आहे.
विमानतळावरील टर्मिनल 2 आणि 3 चे काम सुरळीत सुरू असून काही विमाने त्या टर्मिनल वर शिफ्ट करण्याचे काम सुरू आहे. परंतु या प्रक्रियेला बराच वेळ लागत आहे.
दिल्ली विमानतळावर हेल्पलाईन नंबर:
यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास किंवा मदतीची गरज असल्यास विमानतळ प्रशासनाने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. ट्विट करत DIEL ने याबाबत माहिती दिली आहे. www.newdelhiairport.in या संकेतस्थळाचा वापर करता येणार आहे. त्याचबरोबर 02144797300 हा हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications