Sitaram Yechury : CPMसरचिटणीस सीताराम येचुरी यांचे दिल्लीत निधन, एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
Sitaram Yechury : सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 72 व्या वर्षी दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना काही दिवस एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. येचुरी यांना फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सीताराम येचूरी हे भारतातील दिग्गज राजकारण्यांपैकी एक होते. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस होते. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1952 रोजी चेन्नई येथे झाला. त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात बीए आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) एमए केले आहे. 1974 मध्ये ते स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियामध्ये सामील झाले.
CPI(M) General Secretary Sitaram Yechury passes away.
— ANI (@ANI) September 12, 2024
He was undergoing treatment for Pneumonia at AIIMS, New Delhi.
(file pic) pic.twitter.com/2feop1CKhw
यानंतर सीताराम येचुरी हे 1975 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) चे सदस्य झाले. 1984 मध्ये सीपीआय(एम) च्या केंद्रीय समितीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर 2015 मध्ये ते पक्षाचे सरचिटणीस बनले. 2005 मध्ये ते पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर निवडून गेले. ते डाव्या राजकारणातील एक प्रमुख चेहरा मानले जात होते.
गेल्या काही दिवसांपासून होते आजारी
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) सरचिटणीस सीताराम येचुरी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होते. दरम्यान यानंतर त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. श्वास घेण्यास त्यांना त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले होते याकाळात त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून होते पण त्यांची आज प्राणज्योत मालवली.
सीताराम येचुरी यांना छातीत झाला होता संसर्ग
काल जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की, 72 वर्षीय सीपीआय-एम सरचिटणीस सीताराम येचुरी यांना श्वसनमार्गाचा संसर्ग झाला होता. ज्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून होते. त्यांची प्रकृती आज गंभीर बनली. 19 ऑगस्ट रोजी छातीत संसर्ग झाल्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. सीताराम येचुरी यांच्यावर नुकतीच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
(ही बातमी अपडेट होत आहे...)












Click it and Unblock the Notifications