Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ही तीच विनेश जिला संसदेचं उद्घाटन सुरु असताना ओढत नेलं पंतप्रधानांचं सांत्वन नको न्याय हवा- काँग्रेस

ParisOlympics2024 : पॅरिस ऑलिम्पिमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट अपात्र ठरली. त्यामुळे तिला पदक आणि सामनाही गमवावा लागला. आता यावरुन केंद्र सरकारला विरोधकांनी धारेवर धरले आहे. दरम्यान या प्रश्नी केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविय यांनी संसदेत उत्तरं दिली, पण या उत्तरांनी विरोधी पक्षाचं समाधान झालं नाही आणि त्यांनी संसदेतून 'वॉकआउट' केलं.

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट ही अपात्र ठरल्यामुळे भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलंवहिलं सुवर्णपदकही हुकलं. यामुळे सारा देशालाही हळहळ वाटत आहे. काँग्रेस नेते आणि खासदार रणदीप सुरजेवाला यांनी या मुद्द्यावरुन सरकारवर आरोप केले आहेत.

Paris Olympics Vinesh Phogat Disqualification Mansukh Mandaviya Answers Opposition Walkout From Parliament

140 कोटी भारतीय स्तब्ध - सुरजेवाला

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपात्रतेबद्दल, काँग्रेस खासदार रणदीप सिंह सुरजेवाला म्हणतात, "विनेश फोगटच्या अचानक अपात्रतेने 140 कोटी भारतीय आज स्तब्ध आहेत. हा भारतीय क्रीडासाठी काळा दिवस आहे. मोदी सरकार भारतीय खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रात अपयशी ठरले आहे.

मोदी सरकारनं विनेशला न्याय दिला नाही

रणदीप सुरजेवाला म्हणाले, ही तीच विनेश फोगट आहे जिनं 2023 मध्ये दिल्लीच्या जंतरमंतरवर 140 दिवस आंदोलन केलं आणि मोदी सरकारनं तिला न्याय दिला नाही, हे विसरू नका जेव्हा संसदेचे उद्घाटन केलं जात होतं. तेव्हा भाजप सरकारच्या सांगण्यावरून फोगटला खेचून आणलं होतं. ती निष्पाप होती.

पंतप्रधानांचे सांत्वनाचे ट्वीट नको..न्याय हवा

रणदीप सुरजेवाला म्हणाले, विनेशचे शौर्य आणि क्षमतेत कधीच कमी पडली नाही. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एका दिवसात तीनवेळा तिरंगा फडकावला. तिने एका दिवसात तीन लढती लढल्या आणि तिन्ही जिंकल्या. तेव्हा तिचे वजन 100 ग्रॅमने कसे वाढले? जर हे षडयंत्र नसेल तर काय आहे?

आम्हाला पंतप्रधानांचे सांत्वन करणारे ट्विट नको आहे, आम्हाला त्यांच्याकडून न्याय हवा आहे... त्यांनी विनेश फोगटला न्याय मिळवून देण्यासाठी आयओएकडे का हलवले नाही... भारताला सुवर्णपदक नाकारण्यामागे एक भयंकर षडयंत्र आहे..."

मांडवीय यांचं संसदेतील उत्तर

केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत उत्तर दिलं की, आज विनेशचे वजन 50 किलो 100 ग्रॅम असल्याचे आढळून आले आणि तिला अपात्र घोषित करण्यात आले. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे यासंदर्भात तीव्र निषेध नोंदवला आहे.

ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पीटी उषा पॅरिसमध्ये आहेत, पंतप्रधान त्यांच्याशी बोलले त्यांना विनेश प्रकरणी आवश्यक कारवाई करण्यास सांगितले आहे. सरकारने तिला वैयक्तिक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. विनेशला सर्व प्रकारची मदत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विनेशला चांगले प्रशिक्षक दिले. प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात आलेली आहे असंही ते म्हणाले.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+