Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

निवडणुकीच्या धामधुमीतच मुख्यमंत्र्यांच्या PAवर आयकरचा छापा! 'या' राज्यात उडाली खळबळ!

Jharkhand Assembly Election 2024, Income Tax Raid : झारखंड राज्यात निवडणुकीचा धामधूम सुरु असतानाच मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे स्वीय सचिव सुनील श्रीवास्तव यांच्या घरावर आयकर छापा टाकण्यात आला आहे. आयकर विभागाकडून सुनील कुमार श्रीवास्तव आणि त्याच्या साथीदारांच्या 17 ठिकाणांवर छापे टाकले आहेत. या कारवाईमुळे मात्र राज्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रांचीमध्ये सात आणि जमशेदपूरमध्ये नऊ ठिकाणी इन्कम टॅक्सचे छापे पडत आहेत. जमशेदपूरच्या अंजनिया इस्पातसह इतर ठिकाणांचाही छाप्यामध्ये समावेश आहे. छापेमारीबाबत सविस्तर माहिती येणे बाकी आहे. आयकराची ही कारवाई अशा वेळी झाली आहे की, 13 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे.

Jharkhand Assembly Election 2024

हवालाद्वारे पैशांचा व्यवहार

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीत हवालाच्या मदतीने पैशांचे व्यवहार झाल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली होती. त्यावर 26 ऑक्टोबर रोजी आयटीने रांची, जमशेदपूर, गिरिडीह आणि कोलकाता येथील 35 ठिकाणी छापे टाकले होते. या काळात सुमारे 150 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता आणि गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

छाप्यात सापडलेल्या रकमेची व्यापाऱ्यांच्या खात्यांच्या वह्यांशी जुळणी करून 70 लाख रुपये जप्त करून बँकेत जमा करण्यात आले. हे सर्व झारखंडच्या निवडणुकीशीही जोडलं गेलं आहे. या छाप्याचाही याच्याशी संबंध जोडला जात आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

बेकायदेशीर खाण प्रकरणात छापेमारी

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या सुमारे दोन आठवडे आधी सीबीआयने 1200 कोटी रुपयांच्या बेकायदेशीर खाण प्रकरणात झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील 16 ठिकाणी छापे टाकले होते. यामध्ये झारखंडमधील साहिबगंज, पाकूर आणि राजमहल या तीन जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यात आले. याशिवाय कोलकाता आणि पाटणा येथेही पथकाने तपास केला. एएनआयच्या म्हणण्यानुसार, सीबीआयने छापेमारीत वेगवेगळ्या ठिकाणांहून 60 लाख रुपये रोख, एक किलो सोने आणि 1.25 किलो चांदी जप्त केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+