छत्तीसगडच्या दंतेवाडा-विजापूर सीमेवर चकमक, सुरक्षा दलाने 9 नक्षलवाद्यांना केले कंठस्नान
Dantewada Naxal Encounter : छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि विजापूर जिल्ह्यांमधील सीमा भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू आहे. आतापर्यंत सुरक्षा दलाने 9 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. घटनास्थळावरून नक्षलवाद्यांच्या मृतदेहाजवळ एसएलआर, 303 आणि 12 बोरची शस्त्रे जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बस्तर विभागात माओवादी असल्याची माहिती मिळताच संयुक्त पोलिस पथक शोधमोहिमेवर निघाले. 3 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10:30 च्या सुमारास शोध घेत असताना त्यांचा पीएलजीए कंपनी क्रमांक 02 च्या नक्षलवाद्यांशी सामना झाला, त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार अंदाधुंद गोळीबार सुरू झाला. जवानांनी आतापर्यंत 9 नक्षलवाद्यांना ठार केले आहे.

कशी झाली चकमक मोहीम ?
छत्तीसगडमधील पश्चिम बस्तर विभागात माओवाद्यांच्या कारवाया सुरू असल्याचा सुगावा सुरक्षा जवांनाना लागला. माहिती मिळताच संयुक्त पोलिस पथकाने शोध मोहीम हाती घेतली. मंगळवारी 3 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10:30 च्या सुमारास शोध मोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये सुरक्षा जवानांचा सामना PLGA च्या कंपनी क्रमांक 02 च्या नक्षलवाद्यांशी झाला, त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये गोळीबार झाला. यात 9 नक्षलवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. तर शूर सैनिक नक्षलवाद्यांचा मुकाबला करत असताना अधूनमधून गोळीबार अद्यापही सुरूच आहे. आतापर्यंत या कारवाईत सुदैवाने सहभागी सर्व जवान सुरक्षित असल्याचे सांगण्यात आलेले आहे.
18 जुलैला तेलंगणा सीमेवर झाली होती चकमक
छत्तीसगड-तेलंगणा राज्याच्या सीमेवर 18 जुलै रोजी सकाळी तेलंगणा ग्रेहाऊंड फोर्सच्या नक्षलवाद्यांशी चकमक झाली. विजापूर जिल्ह्यातील इल्मिडीच्या जंगलात घुसलेल्या ग्रेहाऊंड फोर्सने नक्षलवाद्यांच्या मोठ्या तुकडीला घेरल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात एक माओवादी ठार झाला होता.सीमाभागात कायमच नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमकीच्या घटना सुरूच असल्याचे गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.












Click it and Unblock the Notifications