chandra grahan 2026: वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाचा सूतक काळ सुरू! ग्रहणात काय करावे आणि काय टाळावे?
chandra grahan 2026 todays time sutak kaal rules what to do and not to do : २०२६ मधील पहिले चंद्रग्रहण आज ३ मार्च रोजी लागत आहे. चंद्रग्रहणापूर्वी लागणारा अत्यंत संवेदनशील असा सूतक काळ आज सकाळी ६:२० वाजल्यापासून सुरू झाला आहे. ग्रहणाचा हा काळ आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, सूतक लागल्यापासून ग्रहण संपेपर्यंत अनेक धार्मिक आणि दैनंदिन गोष्टींवर मर्यादा आल्या आहेत.

ग्रहणाची वेळ आणि सूतक काळ (Sutak Timing)
भारतीय कालमानानुसार, आज दुपारी ०३:२० वाजता ग्रहणाला सुरुवात होईल आणि संध्याकाळी ०६:४६ वाजता ग्रहण समाप्त होईल. शास्त्राप्रमाणे चंद्रग्रहणाचे सूतक ९ तास आधी लागते. त्यामुळे आज सकाळी ६:२० वाजल्यापासूनच मंदिरांचे कपाट बंद करण्यात आले असून पूजा-पाठ वर्ज्य मानले जात आहेत.
सूतक काळात 'या' चुका टाळा
धार्मिक मान्यतेनुसार, सूतक काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे खालील गोष्टी करू नका.
- भोजन आणि निद्रा: सूतक काळ सुरू झाल्यापासून ग्रहण संपेपर्यंत अन्न ग्रहण करणे, पाणी पिणे आणि झोपणे वर्ज्य मानले जाते.
- पूजा-अर्चा: या काळात मूर्तीस्पर्श करू नये, त्यामुळेच मंदिरांचे दरवाजे बंद ठेवले जातात.
- शुभ कार्य: सूतक काळात कोणतेही नवीन किंवा मंगल कार्य सुरू करू नये.
ग्रहणादरम्यान 'हे' आवर्जून करा
नकारात्मकतेचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सुचवले आहेत.
- मंत्रजप: ग्रहणाच्या काळात 'ॐ नमः शिवाय' किंवा 'गायत्री मंत्राचा' जप करावा. यामुळे मनातील भीती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.
- शुद्धीकरण: ग्रहण सुटल्यानंतर संपूर्ण घराची आणि पूजा घराची स्वच्छता करावी.
- दानधर्म: ग्रहण संपल्यावर गरिबांना दान द्यावे आणि तुळशीसमोर दिवा लावावा.
- ध्यान: आध्यात्मिक ऊर्जा मिळवण्यासाठी ध्यान धारणा करणे लाभदायक ठरते.
हे ग्रहण सिंह राशी आणि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात लागत असल्याने या राशीच्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Daily Horoscope March 3 : आज वर्षातील पहिले चंद्रग्रहण! 'या' राशींच्या आरोग्यात होणार मोठे बदल
(डिस्क्लेमर: सदर माहिती इंटरनेटवर उपलब्ध माहिती आणि धार्मिक मान्यतेवर आधारित आहे. वनइंडिया या वृत्तातील कोणत्याही इनपुटची पुष्टी करत नाही. कोणत्याही कृतीपूर्वी तज्ज्ञ ज्योतिषी किंवा पंडितांचा सल्ला अवश्य घ्यावा.)












Click it and Unblock the Notifications