Central Govt Holidays सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 2026 ची केंद्र सरकारच्या सुट्ट्यांची यादी जाहीर
Central Govt Holidays 2026 List : २०२५ हे वर्ष संपायला अवघा एक महिना शिल्लक असून नवीन वर्ष १ जानेवारीपासून २०२६ हे सुरु होईल. केंद्र सरकारने आगामी २०२६ सालासाठी सरकारी कार्यालयांच्या सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. या परिपत्रकानुसार, पुढील वर्षी सरकारी विभाग आणि कार्यालये कोणत्या दिवशी कोणत्या निमित्ताने बंद राहतील, याची माहिती देण्यात आली आहे.

सुट्ट्यांची संपूर्ण यादी
केंद्र सरकारने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरमध्ये १४ अनिवार्य सुट्ट्या आणि १२ ऐच्छिक सुट्ट्यांचा समावेश आहे.
देशभरातील अनिवार्य सुट्ट्या जाणून घेऊया.
प्रजासत्ताक दिन (Republic Day)
स्वातंत्र्य दिन (Independence Day)
महात्मा गांधी जयंती (Mahatma Gandhi Jayanti)
बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima)
ख्रिसमस (Christmas)
दसरा (Dussehra/Vijayadashami)
दिवाळी (Diwali)
गुड फ्रायडे (Good Friday)
गुरु नानक जयंती (Guru Nanak Jayanti)
ईद-उल-फितर (Eid-ul-Fitr)
ईद-उल-जुहा (Eid-ul-Zuha)
महावीर जयंती (Mahavir Jayanti)
मोहर्रम (Moharram)
ईद-ए-मिलाद (Prophet Mohammad's Birthday)
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही राजपत्रित (Gazetted) सुट्ट्यांची यादी आहे...
सुट्टीचे कारण : तारीख
प्रजासत्ताक दिन : २६ जानेवारी
होळी :४ मार्च
ईद-उल-फितर : २१ मार्च
राम नवमी : २६ मार्च
महावीर जयंती : ३१ मार्च
गुड फ्रायडे : ३ एप्रिल
बुद्ध पौर्णिमा : १ मे
ईद-उल-जुहा (बकरीद) : २७ मे
मोहर्रम : २६ जून
स्वातंत्र्य दिन :१५ ऑगस्ट
ईद-ए-मिलाद :२६ ऑगस्ट
कृष्ण जन्माष्टमी :४ सप्टेंबर
महात्मा गांधी जयंती :२ ऑक्टोबर
दसरा (विजय दशमी) :२० ऑक्टोबर
दिवाळी (दीपावली) :८ नोव्हेंबर
गुरु नानक जयंती :२४ नोव्हेंबर
ख्रिसमस डे :२५ डिसेंबर
ऐच्छिक सुट्ट्या आणि नियम
केंद्र सरकारने एकूण १२ ऐच्छिक सुट्ट्यांची यादी दिली आहे, त्यापैकी कर्मचाऱ्याला केवळ दोन सुट्ट्या निवडण्याचा अधिकार असेल.
ऐच्छिक सुट्ट्यांच्या यादीत समाविष्ट असलेले काही महत्त्वाचे सण..
- नव वर्ष दिवस (१ जानेवारी)
- मकर संक्रांती/पोंगल (१४ जानेवारी)
- बसंत पंचमी (२३ जानेवारी)
- महा शिवरात्री (१५ फेब्रुवारी)
- गुढी पाडवा (१९ मार्च)
- ईस्टर रविवार (५ एप्रिल)
- रक्षा बंधन (२८ ऑगस्ट)
- गणेश चतुर्थी (१४ सप्टेंबर)
- करवा चौथ (२९ ऑक्टोबर)
- छठ पूजा (१५ नोव्हेंबर)
- ख्रिसमस पूर्व संध्या (२४ डिसेंबर)
दिल्ली आणि नवी दिल्ली बाहेर असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी, १४ अनिवार्य सुट्ट्या आणि १२ ऐच्छिक सुट्ट्यांपैकी ३ सुट्ट्या निवडणे आवश्यक असेल. याव्यतिरिक्त, अनिवार्य सार्वजनिक सुट्ट्यांसोबत, रिस्ट्रिक्टेड हॉलिडेजमधून कोणतेही दोन दिवस कर्मचारी निवडू शकतात.
---
-
LPG सिलिंडरचा तुटवडा? घरगुती गॅससाठी प्रतीक्षा करावी लागणार; सरकारचा मोठा निर्णय, वाचा नवे नियम -
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीची तयारी; मतदार यादी जाहीर, 'बिनविरोध'साठी हालचाली! -
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान










Click it and Unblock the Notifications