माजी राष्ट्रपती प्रणव दा यांच्या स्मरणार्थ उभारले जाणार स्मारक; केंद्राने उचलले ऐतिहासीक पाऊल
Pranab Mukherjee Memorial : देशाचे 13 वे राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हे स्मारक दिल्लीचे राष्ट्रीय स्मारक असलेल्या राजघाटावर ते बांधण्यात येणार आहे. ऑगस्ट 2020 मध्ये प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले आणि हे स्मारक त्यांच्या अमिट वारसा आणि देशासाठी दिलेल्या योगदानाचे प्रतीक असणार आहे.
कुटुंबाने कृतज्ञता व्यक्त करत पंतप्रधानांचे मानले आभार
प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी हिने या निर्णयाचे स्वागत केले आणि वडिलांच्या वारशासाठी ही एक हृदयस्पर्शी श्रद्धांजली असल्याचे म्हटले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आणि सांगितले की हे पाऊल पूर्णपणे अनपेक्षित आणि सभ्यतेने भरलेले आहे.

1 जानेवारी रोजी त्यांना गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या भूमी आणि विकास कार्यालयाकडून या स्मारकासाठी जमीन वाटपाची माहिती देण्यात आली. यानंतर शर्मिष्ठा मुखर्जी यांनी स्वतः पंतप्रधान मोदींची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले की, हा पुढाकार माझ्या वडिलांच्या स्मृतीचा आदर असल्याचा पुरावा आहे.
प्रणव मुखर्जींची अनोखी राजकीय कारकीर्द
प्रणव मुखर्जी यांची पाच दशकांहून अधिक काळ असलेली राजकीय कारकीर्द हा भारतीय राजकारणातील एक सुवर्ण अध्याय होता. 2012 ते 2017 पर्यंत त्यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून काम केले. राष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांची धुरा सांभाळली होती. त्यात 2009-2012 चा अर्थमंत्रिपदाचा कार्यकाळ महत्त्वाचा आहे. मुखर्जी यांना 2019 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला.
Central Government has approved the earmarking of a designated site within the "Rashtriya Smriti" complex (a part of the Rajghat precinct) for erecting a Samadhi of Late Pranab Mukherjee, former President of India
— ANI (@ANI) January 7, 2025
Author & daughter of former President Pranab Mukherjee,… pic.twitter.com/087wbeSf7o
काँग्रेसच्या उदासीनतेवर शर्मिष्ठा यांची नाराजी
शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेस पक्षाने त्यांच्या वडिलांच्या निधनाबद्दल औपचारिक शोक प्रस्ताव न आणल्याबद्दल निराशा व्यक्त केला होता. त्या म्हणाल्या की, माझे वडील 45 वर्षे काँग्रेसचे दिग्गज नेते होते. 30 वर्षे काँग्रेस कार्यकारिणीचा भाग होते. त्यांनी काँग्रेसच्या उदासीनतेची सोनिया गांधींच्या वैयक्तिक शोकसंदेशाशी तुलना केली आणि हे पक्षाकडून औपचारिक श्रद्धांजली नसल्याचं लक्षण म्हटलं.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications