मोठी बातमी : CBSE 10 वी, 12 वी साठी यंदा नवीन अभ्यासक्रम जाहीर! दहावीची परीक्षाही वर्षातून दोनवेळा
CBSE 10th 12th new syllabus 2025-26 released : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात 'सीबीएसई'ने (CBSE) शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी इयत्ता 10 वी आणि 12 वीसाठी नवीन अभ्यासक्रम जारी केला आहे. विशेष म्हणजे दहावीची परीक्षा आता वर्षातून दोनवेळा होणार आहे, यासंदर्भातील माहिती सीबीएसई बोर्डकडून जारी झालेल्या एका नोटीफिकेशनद्वारे जारी करण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी इयत्ता 10 वी आणि 12 वीसाठीचा नवीन अभ्यासक्रम सीबीएसईची अधिकृत वेबसाइट, cbse.gov.in वर उपलब्ध आहे. या वेबसाईटवरुन विद्यार्थ्यांना सर्व डिटेल्सही मिळणार आहेत.

CBSE 10वी आणि 12वी नवीन अभ्यासक्रम 2025-26 चे महत्वाचा उद्देश म्हणजे शिक्षणाची परिणामकारकता वाढवणे, विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक कौशल्ये सुधारण्यासाठी नवीन संधी प्रदान करणे हा असून नवीन मार्गदर्शक तत्वानुसार त्याचा विद्यार्थ्यांना मोठा उपयोग होणार आहे.
CBSE - वर्षातून दोनवेळा दहावीची परिक्षा
CBSE ने यंदा दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या वर्षापासून, बोर्ड CBSE वर्ग 10 ची बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा, फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये होणार आहे.
कशामुळे दोनवेळा परीक्षा..?
CBSE ने वर्षातून दोनवेळा दहावीची परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यामागे महत्वाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना अधिक लवचिकता आणि त्यांचे गुण सुधारण्याची संधी मिळावी हा आहे. यासह CBSE 10 वी आणि 12वी नवीन अभ्यासक्रम 2025-26 चा महत्वाचे उद्दीष्ट म्हणजे शिक्षणाची परिणामकारकता वाढवणे हे आहे. विशेष म्हणजे CBSE ने मूल्यांकनात अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता निश्चित करण्यासाठी पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत सुधारणा केली आहे.
कौशल्यावर भर, कोणता अभ्यासक्रम समाविष्ट
सीबीएसई बोर्डाने कौशल्य शिक्षणावर भर दिला आहे. इयत्ता 12 वी मध्ये विविध क्षेत्रांमध्ये कौशल्य निवडक ऑफर केले जातात. यासह बोर्डाने इयत्ता 12वी साठी अ गटात नवीन पर्यायी विषय म्हणून उपयोजित गणिताचा समावेश केला आहे. बोर्ड यावर्षी ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) आणि नवीन पुनर्मूल्यांकन प्रणाली देखील लागू करेल, असे इंडिया न्यूजच्या वृत्तात म्हटले आहे.
सीबीएसईच्या बदलाचे कि पॉइंट
- CBSE इयत्ता 10 चा अभ्यासक्रम 9-पॉइंट ग्रेडिंग सिस्टमवर आधारित राहणार आहे.
- बोर्ड परीक्षा एकूण 80 गुणांची आणि अनिवार्य विषयांसाठी अंतर्गत मूल्यांकनासाठी अतिरिक्त 20 गुण
- CBSE बोर्ड 2025 च्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात एकूण किमान 33 टक्के गुण मिळवणे आवश्यक.
- CBSE इयत्ता 12 ची बोर्ड परीक्षा वर्षातून एकदा घेतली जाईल. 17 फेब्रुवारी 2026 पासून ती सुरू होईल
- शैक्षणिक सत्र 2025-26 पासून इयत्ता 12वीच्या अकाऊंटन्सीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून बेसिक, नॉन-प्रोग्रामेबल कॅल्क्युलेटरला परवानगी.
- शाळांना 10 वी आणि 12 वीच्या वर्गात सीबीएसईच्या नवीन अभ्यासक्रमानुसार शिकवण्याच्या सूचना दिल्या आहेत, अधिकृत नोटीसमध्ये असे लिहिले आहे.












Click it and Unblock the Notifications