Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राजकोट विमानतळावर दिल्लीसारखा अपघात, मुसळधार पावसामुळे छत कोसळले

राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी मोठी दुर्घटना टळली. येथेही दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल १ सारखी दुर्घटना घडली. हिरासर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनलच्या बाहेरील पॅसेंजर पिकअप-ड्रॉप परिसरातील छत कोसळले.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पीएम मोदींनी जुलै 2023 मध्ये राजकोट विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले होते. 1400 कोटींहून अधिक खर्च करून या विमानतळाचा विस्तार करण्यात आला.

rajkot airport accident

याच्या एक दिवस आधी दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 वर अशाच एका घटनेत एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता तर काही जण जखमी झाले होते.

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, दक्षिण गुजरातवर चक्रीवादळ प्रणाली सक्रिय आहे, ज्यामुळे राज्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचेही हवामान खात्याने सांगितले. IMD ने दक्षिण गुजरातसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे.

दरम्यान, गुरुवारी मुसळधार पावसामुळे जबलपूरमधील डुमना विमानतळाच्या नव्याने विस्तारित टर्मिनलच्या छताचा काही भाग तुटला होता. या घटनेत छताखाली उभ्या असलेल्या शासकीय अधिकाऱ्याच्या कारचे नुकसान झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन महिन्यांपूर्वीच या विमानतळाचे उद्घाटन केले होते. छतावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे स्पष्टीकरण जबलपूर विमानतळाच्या व्यवस्थापनाने दिले होते.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने या घटनेबाबत एक निवेदन जारी केले होते. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने या निवेदनात म्हटले आहे की, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी या घटनेची तांत्रिक कारणे तपासली जात आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने या घटनेबद्दल खेद व्यक्त करत आणि सर्वसमावेशक तोडगा काढण्याचे आश्वासन या निवेदतातून दिले होते.

दरम्यान, शुक्रवारी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 वर छत कोसळण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाने एक समिती स्थापन केली आहे. दिल्ली पोलिसांनी घटनेनंतर भारतीय दंड संहितेच्या कलम 304A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि 337 (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कृतीमुळे दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसरीकडे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरी उड्डाण मंत्रालयाने देशभरातील सर्व विमानतळ टर्मिनल्सचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.

एकाच आठवड्यात मुसळधार पावसामुळे देशात तीन वेगवेगळ्या विमानतळावर दुर्घटना घडलेल्या आहेत. यामुळे विरोधकांकडून यावर मोठ्याप्रमाणात प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+