ब्रेकअप-डे ला तुमच्या धोखेबाज जोडीदाराला पाठवा मराठी शायरी अन् स्मरण करुन द्या त्या दिवसाची!
Breakup Day 2025 Shayari : प्रेमाचा दिवस अर्थात व्हॅलेटाईंन डे 14 फेब्रुवारी सर्वत्र साजरा झाला. प्रेमी युगलांनी एकमेकांना प्रेमाच्या आणाबाका देऊन एकत्र राहण्याची शपथ घेतली. तर व्हॅलेंटाईन डेच्या ठीक सात दिवसाने ब्रेकअप डे साजरा केला जातो. या दिवशी काही प्रेमी युगल आपल्या जोडीदारासोबतचे संबंध तोडून टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मनातील भावना ते व्यक्त करून एकमेकांपासून दूर होतात.
चला तर जाणून घेऊया ब्रेकअप डे च्या दिवशी प्रेमीयुगुल एकमेकांना कोणते संदेश व शायरी पाठवून त्यांना एकमेकांपासून दूर होण्याचा प्रयत्न करतात. चला तर ब्रेकअप डे च्या दिवशी कोणते संदेश शुभेच्छा संदेश पाठविले जातात. ते खालीलप्रमाणे आहेत.

भेट आपली शेवटची
हसून निरोप घेत आहे
वरुन शांत असलो
तरी हृद्यातून रडत आहे
जात आहेस सोडून मला
नाही अडवणार मी तुला
असशील तिथे सुखी राहा
ह्याच माझ्या शुभेच्छा तुला
जो अश्रू दिसत नाही ना
तो खूप खोलवर जाऊन
आपल्याला हृदयाला नुकसान पोचवतो
माझे अश्रू तुला आज दिसणार नाहीत
आणि माझ्या जखमाही कधीही भरणार नाहीत

प्रेमाची पण एक गंमतच आहे,
त्याच्यावरच जडतं
जी व्यक्ती आपल्यासाठी
बनलेलीच नसते. हो ना...
ज्या दिवशी मी काय होते
ते कळेल ना
त्या दिवशी स्वतःला
माफ करू शकणार नाहीस.
जगात दोन तऱ्हेची माणसं असतात.
एक जी लोकांमध्ये राहून दुःखी राहणं पसंत करतात
आणि दुसरी जी एकटं राहून दुःखी राहणं पसंत करतात.
तुला लवकरच कळेल की,
माझं असणं काय होतं
आणि तुझ्या आयुष्यात
माझं नसणं काय असेल
रागवू नकोस निघून जाईन खूप दूर
फक्त थोडं थांब माझ्या तुटलेल्या मनाचे
तुकडे तरी गोळा करून दे
मला माझ्या वाईट काळात
सोडून जाणाऱ्यांनो
माझ्या चांगल्या काळात
माझ्याकडे कोणत्या तोंडाने परत याल
तुझ्या खोटेपणाचा मुखवटा ज्या दिवशी उतरेल
त्या दिवशी स्वतःशी नजर मिळवण्याच्या
लायकीचाही राहणार नाहीस...लक्षात ठेव
सोडून जायचं होतं तर...
सांगून जायचं ना पागल.
तुला हसत हसत
सोडलं असतं.

डोळे भरून आले की, तुझं रूप दिसायला लागतं
छे! ते दिसण्यासाठी डोळ्यातलं पाणी
हलक्या हाताने कोणी पुसायला लागतं.
कृपया प्रेमाच्या नावाखाली
तुमचे करिअरपणाला लावू नका
कारण...प्रेम वगैरे
सर्व अंधश्रद्धा आहे.












Click it and Unblock the Notifications