Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

थरारक! बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृण हत्या! हे कारण आले समोर, दोघांना अटक

Bollywood actress huma qureshis cousin brother murdered : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची काल ७ ऑगस्टला रात्री अकराच्या सुमारास निर्घृणपणे हत्या करण्यात आली. दिल्लीत ही घटना घडली असून जंगपुरा लेनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. आपल्या भावाच्या खुनानंतर बाॅलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीला आणि कुटुंबियांना धक्का बसला आहे.

प्राप्त माहितीनुसार, आसिफ कुरेशी असे हत्या झालेल्याचे नाव असून तो हुमा कुरेशीचा चुलत भाऊ होता. गुरुवारी ७ ऑगस्टला रात्री ११ वाजेच्या सुमारास दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील जंगपुरा भोगल लेनमध्ये त्याचा निर्घृण हत्या करण्यात आली.

Bollywood actress top huma qureshis cousin brother murdered

किरकोळ कारण

आसिफ कुरेशीची हत्या किरकोळ कारणातून झाली. शेजाऱ्यांशी पार्किंगच्या वादातून आसिफवर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आल्याचे वृत्त वनइंडिया हिंदीने दिले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आसिफ कुरेशीला जवळच्या रुग्णालयात तातडीने नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

यापूर्वीही झाला होता वाद

पोलिसांच्या माहितीनुसार, आसिफची पत्नी सैनाज कुरेशी हिने सांगितले की, आरोपींसोबत यापूर्वीही याच मुद्द्यावरून वाद झाला होता. गुरुवारी आसिफ कामावरून परतला तेव्हा त्याने पाहिले की शेजाऱ्याने त्याच्या घराच्या मुख्य गेटसमोर दुचाकी पार्क केली होती. आसिफने गाडी काढून टाकण्यास सांगितले, परंतु गाडी काढून टाकण्याऐवजी आरोपीने शिवीगाळ सुरू केली आणि नंतर हा वाद वाढला. या वादातूनच आसिफ कुरेशीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

दोघांना अटक

किरकोळ कारण जरी असले तरीही आसिफ कुरेशी आणि शेजाऱ्यांत पार्किंगवरुन आधीपासून वाद असल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास प्रक्रियेला सुरुवात केली असून संशयित मारेकऱ्यांविरुद्ध पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पळून गेलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+