Viral Video: कोण आहे ही बॉडीबिल्डर नवरी?, जिचे फिटनेस पाहून पुरुषांनाही वाटेल लाज, युझर्स म्हणाले-..
Body Builder Bride Viral Video : आता केवळ पुरुषच नाही तर महिला देखील बॉडी बिल्डिंगच्या जगात स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. या संदर्भात, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका तरुणीने वधूच्या वेशात सजून आहे, परंतु तिचे मजबूत शरीरयष्टी पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत.
या व्हायरल व्हिडिओमध्ये, वधू तिच्या हातांना तेल लावताना दिसत आहे, नंतर जेव्हा तिने तिचे स्नायूचे प्रदर्शन केले तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले. लोकांना विश्वासच बसू शकणार नाही की, हा एका मुलीचे शरीर आहे. व्हिडिओमध्ये, ती पारंपारिक वधूसारखी भारी दागिन्यांसह सजली आहे, परंतु तिच्या मजबूत शरीरयष्टीवरून तिची मेहनत आणि तिचे त्या विषयी असलेले समर्पण नक्की दिसून येते.

बॉडीबिल्डर वधू पाहून अनेकांना बसलाय धक्का!
- या व्हिडिओवर लोक मजेदार आणि प्रेरणादायी कमेंट्स करत आहेत. कोणीतरी लिहिले, "संपूर्ण सासरचे घर घाबरले आहे!", तर कोणीतरी म्हटले, "या सुनेला गळ्यातील दागिन्यांसह पदके असायला हवी होती."
- दुसऱ्या एका वापरकर्त्याने असा टोमणा मारला की, "जर तिच्या सासू किंवा वहिनीने तिला टोमणे मारण्याचा प्रयत्न केला तर ती तिचे शरीर दाखवेल आणि सर्वजण गप्प बसतील."
- तर अनेक युझर्सकडून याला अभिनााची गोष्ट असल्याचे म्हटले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, "घाबरण्याची गरज नाही, मुलीने इतके उत्तम शरीरयष्टी निर्माण केली आहे याचा अभिमान बाळगण्याची गरज आहे."
पुरा ससुराल डरा हुआ है,,,,🖋️😂 pic.twitter.com/BRyyFz6fTK
— ≛ज़ख़्मी ͥ ͣ ͫशायर♛ (@Zakhmi_shyar_) February 22, 2025
बॉडीबिल्डर वधू कोण आहे?
वधूचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओतील वधूचे नाव आहे चित्रा पुरुषोत्तम. चित्रा ही कर्नाटकातील एक लोकप्रिय बॉडीबिल्डर आहे. जिने अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा जिंकल्या आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने मिस इंडिया फिटनेस अँड वेलनेस, मिस साउथ इंडिया मिस कर्नाटक (5 वेळा विजेती), मिस बेंगळुरू आणि मिस म्हैसूर वोडेयार या किताबाने तिला गौरविण्यात आलेले आहे. याशिवाय, इंस्टाग्रामवर तिचे भरपूर व्हिडिओ आहेत. चित्राचे इंस्टाग्रामवर 1 लाख 26 हजार फॉलोअर्स आहेत. तिच्या रिल्सला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.












Click it and Unblock the Notifications