Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी! दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव; वाचा नेमके काय-काय घडले...

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊ लागले आहेत. यात अनेक दिग्गजांचा पराभव होताना दिसत आहे. सर्वात आश्चर्यकारक निकाल जंगपुरा येथून आला. येथे आम आदमी पक्षाचे उमेदवार आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला. पहिल्या फेरीपासून ते मागे पडल्याचे दिसत होते. आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर जंगपुरा विधानसभेची जागा व्हीआयपी झाली होती.

delhi assembly election 2025

सिसोदिया यांचा पराभव

मनीष सिसोदिया यांचा भाजपचे तरविंदर सिंग मारवाह यांनी पराभव केला . दारू घोटाळ्यात अटक झाल्यानंतर जामीनावर सुटलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी यावेळी पटपडगंज जागा सोडावी लागली. त्यांना जंगपुरा येथून उमेदवारी देण्यात आली होती. पक्षाने विद्यमान आमदार प्रवीण कुमार यांचे तिकीट कापले होते आणि सिसोदिया यांना जंगपुरा येथून उमेदवारी दिली होती परंतु त्यांना जागा जिंकता आली नाही.

जंगपुराचा इतिहास काय

जंगपूर विधानसभेत १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसला दहा वर्षांपूर्वी 'आप'ने दारुण पराभव केला होता. यावर्षी जंगपुरा येथे काँग्रेस आणि आप यांच्यात थेट लढत होती. आपचे मनिंदर सिंग धीर यांना २९७०१ आणि काँग्रेसचे तरविंदर सिंग मारवाह यांना २७९५७ मते मिळाली. मनिंदर यांच्या विजयाचे अंतर १७४४ मतांचे होते. यावर्षी तीन वेळा आमदार राहिलेले तरविंदर सिंग मारवाह यांचा पराभव झाला.आता मात्र येथे दहा वर्षानंतर भाजपचे खाते उघडले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+