Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आता केजरीवालांचे तिहार जेलमध्ये जाणे निश्चित; दिल्लीत भाजपची सत्ता येताच 'या' खासदाराने दिला इशारा

भाजप खासदार योगेंद्र चंडोलिया यांनी दिल्ली निवडणुकीतील भाजपच्या विजयाच्या वाटचालीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींचे आवाहन ऐकल्याबद्दल मी दिल्लीच्या जनतेचे आभार मानतो. केजरीवाल सर्वच बाबतीत कोसळले आहेत. केजरीवाल तिहार तुरुंगात जातील हे निश्चित झाले आहे. असे ते म्हणाले.

खा. चंडोलिया म्हणाले की, त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते पण ते आता आमदारही राहणार नाहीत. पक्षाच्या हायकमांडने निवडलेला कोणताही पक्ष कार्यकर्ता दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री असेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Delhi Assembly Election 2025

हे ही वाचा : दिल्ली निवडणुकीत 'आप' का हारले, अशी 5 कारणं ज्यात केजरीवालांना दाखवला घरचा मार्ग, जाणून घ्या

अण्णा हजारेंनीही दिली केजरीवालांच्या पराभवाचे कारणं

दिल्ली विधानसभा निवडणुकीची आज सकाळपासून मतमोजणी सुरू झाली आहे. सध्याच्या कलानुसार भाजप ४४ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे गेली दहा वर्षे सत्तेत असलेले आम आदमी पक्षाला फक्त २६ जागांवर आघाडीवर दिसत आहे. दिल्लीतील याच सत्ताबदलाच्या कलानुसार आता राजकीय व सामाजिक वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे एक विधानही समोर आले आहे. अरविंद केजरीवाल का हारले, याचा लेखाजोखाच हजारे यांनी मांडला. त्यांचे हेच वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+