बिहारला मुख्यमंत्रीपदी कोण हवे?, तेजस्वी, नितीश कुमार की पीके?, सर्व्हेक्षणातून धक्कादायक खुलासा!
C Voter Survey on Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. NDA आणि महाआघाडीमध्ये चुरशीची लढत असतानाच, जनसुरजचे संस्थापक प्रशांत किशोर (PK) यांच्या प्रवेशामुळे निवडणूक आणखी रंजक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, सी व्होटर सर्व्हेने बिहारच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्रीपदाची पसंती समोर आणली आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी, नितीश की पीके?
सी व्होटर सर्वेक्षणाच्या वतीने, सप्टेंबरमध्ये केलेल्या या ताज्या सर्वेक्षणात तेजस्वी यादव यांनी लोकप्रियतेत मोठी आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, निवडणूक रणनितीकार ते राजकारणी झालेले प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चिराग पासवान यांना मागे टाकत आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे.
- मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार पक्ष/संघटना पसंतीचे प्रमाण (%)
- तेजस्वी यादव (माजी उपमुख्यमंत्री) : ३६%
- प्रशांत किशोर (PK) जन सूरजचे संस्थापक : २३%
- नितीश कुमार (मुख्यमंत्री) : १६%
- चिराग पासवान एलजेपी नेते : १०%
- सम्राट चौधरी (उपमुख्यमंत्री) : ७%
तेजस्वी यादव यांना सर्वाधिक ३६ टक्के लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात योग्य उमेदवार मानले आहे. तर प्रशांत किशोर यांनी थेट २३ टक्के लोकांची पसंती मिळवत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची इच्छा फक्त १६ टक्के लोकांनी व्यक्त केली आहे. तर चिराग पासवान (१०%) आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी (७%) यांना अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.
नितीश कुमारांच्या कामगिरीवर किती समाधानी?
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कामावर बिहारच्या लोकांचे किती समाधान झालेले आहे, याबद्दलही सर्वेक्षणात महत्त्वाचे आकडे समोर आले आहेत.
- समाधानाचे प्रमाण
- फेब्रुवारी २०२५ - ५८ टक्के
- जून २०२५ - ६० टक्के
- सप्टेंबर २०२५ (नवीन) -६१ टक्के
ताज्या सप्टेंबरच्या सर्वेक्षणात ६१ टक्के लोक नितीश कुमार यांच्या कामगिरीवर समाधानी आहेत, तर ३८ टक्के लोकांनी असंतुष्टता व्यक्त केली आहे. याचा अर्थ, मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांच्याबद्दल लोकांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात सकारात्मक मत आहे, पण त्यांची लोकप्रियता मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत मात्र कमी झाली आहे.
पंतप्रधानपदासाठी कोण हवे?
बिहारच्या जनतेला पंतप्रधान म्हणून कोणावर विश्वास आहे, याबाबतही सर्वेक्षणातून आकडेवारी समोर आली आहे:
- नरेंद्र मोदी : ५२ टक्के लोकांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला.
- राहुल गांधी : ४१ टक्के लोकांनी त्यांना पंतप्रधान म्हणून पसंती दिली.
या आकडेवारीनुसार, बिहारमधील जनतेचा कल पंतप्रधानपदासाठी अजूनही नरेंद्र मोदी यांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट होते. एकंदरीत, सी व्होटरच्या या ताज्या सर्वेक्षणामुळे बिहारच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदासाठी मोठी चुरस दिसून येत आहे. तेजस्वी यादव सध्या आघाडीवर असले तरी, प्रशांत किशोर यांनी दिलेले आव्हान आगामी निवडणुकीत निर्णायक ठरू शकते.












Click it and Unblock the Notifications