'त्यांना मृतदेहांवर राजकारण करू द्या', बंगळुरू चेंगराचेंगरीवर बोलताना कर्नाटक DCM डीके शिवकुमार रडले
Bengaluru stampede (RCB victory event) : विरोधी पक्षांना मृतदेहांवर राजकारण करू द्या, त्यांनी किती मृतदेहांवर राजकारण केले आहे याची यादी मी देईन. पण लहान मुलांना पाहून दुःख होते. मी त्यांचे दुःख पाहिले आहे. मी रुग्णालयात गेलो तेव्हा लहान मुलांना पाहून अंगावर काटा उठतो थेट मन रडायला लागते., असे विधान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी गुरुवार, माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
बुधवार, 04 जून रोजी बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे किमान 11 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 33 जण जखमी झाले आहेत. मृतांवर शोक व्यक्त करताना डीके शिवकुमार म्हणाले की, एवढी मोठी गर्दी येथे पोहोचेल अशी त्यांना अपेक्षा नव्हती.

डीके शिवकुमार म्हणाले, असे घडायला नको होते आणि आम्हाला एवढ्या मोठ्या गर्दीची अपेक्षा नव्हती. स्टेडियमची क्षमता 35 हजार आहे, पण तिथे 3 लाखांहून अधिक लोक होते. (स्टेडियम) दरवाजे तुटले होते. या घटनेबद्दल आम्ही दिलगीर व्यक्त करतो. आम्हाला त्यामागील कारण जाणून घ्यायची आहेत त्यावर उपाय देखील केली जात आहे.
#WATCH | Bengaluru: Karnataka DCM DK Shivakumar breaks down as he comes out to address the media for the first time after the #BengaluruStampede. pic.twitter.com/1GDMZOBAm4
— ANI (@ANI) June 5, 2025
डीके शिवकुमार यांनी या बोर्डाला दिला दोष
डीके शिवकुमार यांनी त्यांच्या सरकारला क्लीन चिट दिली. माध्यमांसमोर रडत डीके शिवकुमार यांनीही त्यांच्या सरकारला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की, याची संपूर्ण जबाबदारी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) ची आहे. पण तरीही आम्ही संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेत आहोत. ते म्हणाले की जे काही घडले आहे ते हृदयद्रावक आहे.
डीके शिवकुमार यांनी पुढे बोलताना भारतीय जनता पक्षावर या घटनेचे राजकारण करण्याचा आरोप केला. ते म्हणाले की, भाजप राजकारण करत आहे... आम्हाला या घटनेबद्दल खूप वाईट वाटते. भविष्यात आम्ही एक चांगला उपाय शोधू, असेही आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.












Click it and Unblock the Notifications