Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बँक ग्राहकांनो सावधान! आज देशभर बँक संप; सलग चौथ्या दिवशी बँकांचे कामकाज ठप्प, पाहा काय आहे कारण

Bank Strike Today India Jan 27 2026 : आज, मंगळवार २७ जानेवारी २०२६ रोजी देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता आहे. 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स' (UFBU) ने पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे हा परिणाम होणार आहे. आठवड्यातून पाच दिवस काम (5-Day Work Week) या प्रमुख मागणीसाठी १० लाख कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Bank Strike Today India Jan 27 2026  List of Closed Banks  amp amp  Affected Services

सलग ४ दिवस बँका बंद?

विशेष म्हणजे, शनिवार आणि रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) निमित्त बँका बंद होत्या. आज २७ जानेवारीला संप असल्याने अनेक ठिकाणी सलग चौथ्या दिवशी बँकांचे दरवाजे उघडणार नाहीत. यामुळे चेक क्लिअरन्स, रोख रक्कम भरणे आणि कर्ज प्रक्रिया यांसारख्या सेवांवर मोठा परिणाम होऊ शकतो.

संपाचे मुख्य कारण काय?

बँक युनियन्सची मागणी आहे की, बँकांसाठी सर्व शनिवार सुट्टी जाहीर करून आठवड्यातून केवळ ५ दिवस काम असावे. मार्च २०२४ मध्ये इंडियन बँक्स असोसिएशनसोबत (IBA) यावर प्राथमिक करार झाला होता, मात्र सरकारने अद्याप त्याला अधिकृत मंजुरी दिलेली नाही. या विलंबाचा निषेध करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.

कोणत्या बँकांवर परिणाम होईल?

प्रभावित बँका: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा आणि इतर सर्व सरकारी बँका.

सुरू राहणाऱ्या बँका: एचडीएफसी (HDFC), आयसीआयसीआय (ICICI) आणि ॲक्सिस (Axis) यांसारख्या खाजगी बँकांचे कामकाज सुरळीत राहण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन सेवा: नेट बँकिंग, यूपीआय (UPI) आणि मोबाईल बँकिंग सेवा सुरू राहतील, मात्र एटीएममध्ये रोख रकमेचा तुटवडा जाणवू शकतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+