Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अ‍ॅडल्ट फिल्ममध्ये काम करणारी रिया बर्डे कोण आहे? बांग्लादेश अन् मुंबईशी संबंध काय जाणून घ्या

Bangladeshi adult actress Riya Barde : रिया बर्डे हे नाव सध्या चर्चेत आहे. वरवरं सर्वच मराठी नाव वाटतं पण या नावामागे काहीतरी लपवल्यासारखं वाटतं. चेहरा मात्र फारच निरागस वाटत असला तरीही मुंबई पोलिस या महिलेच्या मागावर होते आणि ती अखेर जाळ्यात अडकलीच. पण ही रिया बर्डे कोण ती काय करत होती तिला कशासाठी अटक झाली हे जाणून घेऊया.

मुंबई पोलिसांनी रिया उर्फ आरोही बर्डेला बनावट कागदपत्रांसह अटक केली होती. कागदपत्रे आणि तिचा बांगलादेशशी संबंध काय हे पोलिस तपासत असतानाच त्यांना मोठी माहिती हाती लागली .रिया उर्फ आरोही बर्डे आणि बन्ना शेख या छद्म नावाच्या रिया अरविंदा बर्डेला गुरुवारी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.

Bangladeshi adult film actress riya barde

कोण आहे रिया बर्डे

रिया बर्डे एक अडल्ट मुव्हीमध्ये अभिनेत्री म्हणून काम करत होती आणि तिने मुंबईतही काम केले होते, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे. बांगलादेशी प्रौढ चित्रपट अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये कलाकारांसोबत काम केले होते आणि 2023 च्या आमरस चित्रपटातील तिच्या कामासाठी ती प्रसिद्ध आहे.

का केली अटक?

रिया बर्डे ही एक बांगलादेशी प्रौढ चित्रपट अभिनेत्री आहे, जी सर्व बेकायदेशी कारणांमुळे चर्चेत आली आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी 27 सप्टेंबर रोजी उल्हासनगर येथून बागलादेशी पॉर्न स्टारला अटक केली.

रिया बार्डची ओळख आणि फसवणूक आणि बनावट प्रकरणात सहभाग असल्याची माहिती मिळाल्यानंतर, हिल लाइन पोलिस स्टेशनने एफआयआर नोंदवला. आकारण्यात आलेल्या आरोपांमध्ये विदेशी कायद्यासह फसवणूक, बनावटगिरी आणि सामान्य हेतूशी संबंधित आयपीसी कलमांचा समावेश आहे.

एक वर्षांपासून सुरु होता तपास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया बर्डेच्या ओळखीचा तपास एका वर्षापूर्वी सुरू झाला होता. या तपासामुळे पोलिसांनी या बांगलादेशी पॉर्न स्टारचा जन्म दाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला मिळाला. तिच्या पासपोर्टमध्ये पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा, हुगळी आणि महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अचलपूरसह तीन वेगवेगळ्या जन्मस्थळांची यादी आहे. अर्थात ती वेगवेगळ्या नावाने येथे राहत राहत असल्याचेही समोर आले आहे.

रिया बर्डे हिने तिच्या स्वतःच्या कागदपत्रांची फसवणूक करून तिच्या एका साथीदाराचे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र आणि पासपोर्ट मिळवण्यासाठी कट रचला अशी माहितीही समोर आली आहे. या बनावट रॅकेटबद्दल तपासात तपशील उघड झाल्याचे बोलले जात आहे.

आई बेकायदेशीररित्या राहत होती भारतात

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रिया बर्डे तिची आई अंजली बर्डे हिच्यासोबत रुबी शेख नावाने बेकायदेशीरपणे भारतात राहत होती. देशात राहण्यासाठी तिच्या आईने अमरावतीचे रहिवासी अरविंद बर्डे यांच्याशी लग्न केले. मात्र, रिया बर्डेचे वडील आणि आई सध्या कतारमध्ये राहतात, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे या प्रकरणातही संशयकल्लोळ आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+