आतिशींनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला, पण केजरीवालांच्या खुर्चीवर बसल्या नाहीत,कारण.....
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्री आतिशी आज पहिल्यांदाच दिल्ली सचिवालयात पोहोचल्या, पण त्या माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या खुर्चीवर बसल्या नाहीत. आतिशी दुस-या पांढऱ्या रंगाच्या खुर्चीवर बसल्या. त्यांच्या खुर्चीसोबत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची लाल रंगाची खुर्ची ठेवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या, आज मी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आज माझ्या मनात भरताला जसं दु:ख होतं, ज्या प्रकारे भगवान श्री रामाच्या पादुका ठेऊन भरतजींनी काम केलं, त्याच प्रकारे मी पुढील 4 महिने मुख्यमंत्रीपद सांभाळणार आहे.
"ही खुर्ची केजरीवालजींची आहे"
सीएम आतिशी म्हणाले, गेल्या 2 वर्षांपासून भाजपने अरविंद केजरीवाल यांच्यावर चिखलफेक करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, त्यांना 6 महिने तुरुंगात टाकले. अरविंद केजरीवाल यांना एजन्सीने दुर्भावनापूर्ण हेतूने अटक केल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. आतिशी पुढे म्हणाल्या, ही खुर्ची अरविंद केजरीवाल जी यांची आहे, मला विश्वास आहे की फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकीत दिल्लीची जनता अरविंद केजरीवाल यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवेल. तोपर्यंत अरविंद केजरीवालजींची खुर्ची इथेच राहील. आतिशी पुढे म्हणाल्या, आमच्या विश्वासाने आणि आत्मविश्वासाने आम्ही पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांना या खुर्चीवर बसवू आणि तोपर्यंत ही खुर्ची याच खोलीत राहील.

"मुख्यमंत्रिपदाची खुर्ची केजरीवालांची"
सीएम आतिशी म्हणाल्या, अरविंद केजरीवाल यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श ठेवला आहे. गेल्या दोन वर्षांपासून भाजपने केजरीवाल यांची प्रतिमा डागाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले आणि त्यांना 6 महिने तुरुंगात टाकण्यात आले.
अरविंद केजरीवाल म्हणाले होतो, जोपर्यंत दिल्लीचे लोक त्यांना प्रामाणिक मानत नाहीत, तोपर्यंत ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाहीत. यामुळे त्यांनी राजीनामा दिला. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची अरविंद केजरीवाल यांच्याकडे आहे. मला आशा आहे की दिल्लीची जनता पुन्हा एकदा केजरीवाल यांना मुख्यमंत्री बनवेल.
#WATCH | Delhi's new CM Atishi takes charge as the Chief Minister. pic.twitter.com/ZBH8tfLmGe
— ANI (@ANI) September 23, 2024
भाजपने आतिशींवर साधला निशाणा
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही सीएम आतिशी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्या नाहीत आणि खुर्ची घेऊन सचिवालयात पोहोचल्या, यावर
आता भाजपच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आतिशी यांच्यावर निशाणा साधत भाजप नेते अमित मालवीय म्हणाले, हे नाटक दिल्लीत थांबले पाहिजे. आज आतिशी मार्लेना यांनी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीशेजारी रिकामी खुर्ची ठेवून पदभार स्वीकारला.म्हणजे अतिशी या दिल्ली सरकारच्या मनमोहन सिंग आहेत आणि खरे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत, ज्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सचिवालयात जाणे तर दूरच, फाईलवर सही करण्यापासूनही थांबविले आहे,.
ते पुढे म्हणाले, ही डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या राज्यघटनेची थट्टा आहे. मार्लेना यांनी मुख्यमंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.रिकाम्या खुर्चीवर बसलेल्या केजरीवालांच्या भुताने नव्हे.












Click it and Unblock the Notifications