महाराष्ट्रात आता दिवाळीनंतरच विधानसभा निवडणुका! जम्मू-काश्मीर, हरियाणात 'या' तारखेला इलेक्शन

Maharashtra Assembly Election: केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु असून हरियाना आणि जम्मू काश्मिरमध्ये विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

जम्मू काश्मीरात विधानसभा निवडणूक तीन टप्प्यात होणार असून 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर 4 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. हरियाणात 1 ऑक्टोबरला मतदान होणार असून 4 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे असे राजीवकुमार यांनी सांगितले आहे. तर महाराष्ट्रात तूर्त विधानसभा निवडणुकीबाबत त्यांनी घोषणा केली नाही.

Jammu Kashmir  Haryana Assembly Election 2024 Latest Update in marathi

जगातील सर्वात मोठी निवडणूक प्रक्रीया - राजीवकुमार

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, "२०२४ च्या लोकसभा निवडणुका ही जागतिक पातळीवरील सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया होती. ती यशस्वीपणे आणि शांततेने पार पडली. संपूर्ण लोकशाही जगासाठी एक अतिशय मजबूत लोकशाहीचा पाया निर्माण केला, ती कोणत्याही प्रकाराशिवाय शांततापूर्ण होती.

Jammu Kashmir  Maharashtra  Haryana  Jharkhand Assembly Election 2024 Latest Update

राजीव कुमार म्हणाले, "जम्मू आणि काश्मीरमधील लोकसभा निवडणुकीदरम्यान, लोक निवडणुकीत भाग घेण्यासाठी आले होते. लांबलचक रांगा आणि त्यांच्या चेहऱ्यावरील चमक याचा पुरावा होता... संपूर्ण निवडणुकीत त्यांचा राजकीय सहभाग होता.

Jammu Kashmir  Maharashtra  Haryana  Jharkhand Assembly Election 2024 Latest Update

हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 - तारखा

सध्या हरियाणामध्ये भाजपचे सरकार आहे. नायबसिंग सैनी हे मुख्यमंत्री आहेत. सध्याच्या हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ 3 नोव्हेंबर 2024 रोजी पूर्ण होत आहे. हरियाणात विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत.

  • सध्या 87 पैकी 3 जागा रिक्त आहेत.
  • हरियाणात बहुमताचा आकडा 46 जागांचा आहे.
  • सध्या, HLP-1 आणि एक अपक्ष यांच्या मदतीने भाजप 41 आमदारांसह सत्तेत आहे.
  • हरियाणात विरोधी पक्षाच्या खात्यात काँग्रेसचे 29, जेजेपीचे 10, आयएनएलडीचे 1 आणि 4 अपक्ष आमदार आहेत.

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुका 2024 - तारखा

  • 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 काढून जम्मू आणि काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला.
  • केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत.
  • 2018 मध्ये विधानसभा विसर्जित करण्यात आली. जम्मू-काश्मीर विधानसभेत एकूण 90 जागा आहेत.
  • जम्मू प्रदेशात विधानसभेच्या 47 आणि काश्मीर प्रदेशात 43 जागा आहेत.
  • जम्मू-काश्मीर निवडणुकीत शांतता आणि सुव्यवस्था राखणे हे सर्वात मोठे आव्हान आहे.
  • राज्यत्व, सुरक्षा, रोजगार हे जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे प्रमुख मुद्दे आहेत.

जम्मू-काश्मीर निवडणुकीचे असे आहेत तीन टप्पे

  1. जम्मू-काश्मीरच्या निवडणुका तीन टप्प्यात होत आहेत पहिल्या टप्प्यात 20 ऑगस्टला अधिसूचना निघेल तर 18 सप्टेंबरला मतदान होणार आहे.
  2. दुसऱ्या टप्प्यात 29 ऑगस्टला अधिसूचना निघेल तर 25 सप्टेंबरला मतदान होईल.
  3. तिसऱ्या टप्पात 5 सप्टेंबरला अधिसूचना निघेल तर 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांतील निवडणुकीतील मतांची मोजणी 4 ऑक्टोबर रोजी होईल.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+