Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

"मी वक्क्फच्या जमिनीचा एक इंचही भाग गमावणार नाही"; ओवैसींचा सरकारला इशारा, व्हिडिओ व्हायरल!

Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवैसी यांनी वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावरून लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. वक्फ मुद्द्यावर ओवेसी यांनी केंद्र सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर ओवैसी यांनी हे विधेयक देशाच्या प्रगतीला अडथळा ठरणारे आहे आणि मी माझ्या मशि‍दीचा किंवा दर्ग्याचा एक इंचही भाग गमावणार नाही असा इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला.

असुदोद्दीन ओवैसी हे लोकसभेत बोलत होते. लोकसभेत आपल्या भाषणादरम्यान त्यांनी सरकारला इशारा दिला आणि केंद्र सरकारच्या प्रस्तावित वक्क्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला जोरदार विरोध दर्शविला.

Asaduddin Owaisi

एआयएमआयएम खासदार म्हणाले, "मी या सरकारला इशारा देत आहे की जर तुम्ही वक्फ कायदा त्याच्या सध्याच्या स्वरूपात आणला तर तो कलम 25, 26 आणि 14 चे उल्लंघन होईल. यामुळे या देशात सामाजिक अस्थिरता निर्माण होईल. यानंतरही ओवेसी बरेच काही बोलले आहेत."

ओवैसींचा सरकारला इशारा

असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत भाषण करताना म्हटले की, 'मी या सरकारला इशारा देत आहे आणि इशारा देत आहे - जर तुम्ही वक्फ विधेयक सध्याच्या स्वरूपात संसदेत आणले आणि ते कायदा केले तर ते देशात सामाजिक अस्थिरता निर्माण करेल.' ते संपूर्ण मुस्लिम समुदायाने नाकारले आहे. वक्त विधेयकाचा सध्याचा मसुदा, जर तो कायदा बनला तर, तो कलम 25, 26 आणि 14 चे उल्लंघन करेल. आम्ही वक्फची कोणतीही मालमत्ता सोडणार नाही, काहीही शिल्लक राहणार नाही.

...तर एक इंच भाग गमावणार नाही

असुदौद्दीन ओवैसी म्हणाले, वक्क्फ बोर्डसंदर्भात प्रस्तावित विधेयक देशाच्या प्रगतीला अडथळा आणेल. 'तुम्हाला विकसित भारत हवा आहे, आम्हालाही विकसित भारत हवा आहे. तुम्हाला या देशाला 80 आणि 90 च्या दशकात परत घेऊन जायचे आहे. जर असे काही घडले तर त्याची जबाबदारी तुमची असेल. कारण, एक अभिमानी भारतीय मुस्लिम म्हणून, मी माझ्या मशिदीचा एक इंचही भाग गमावणार नाही. मी माझ्या दर्ग्याचा एक इंचही भाग गमावणार नाही. मी हे होऊ देणार नाही.

आता.. राजनैतिक चर्चेसाठी येणार नाही

ओवैसी म्हणाले, "आम्ही आता येथे राजनैतिक चर्चेसाठी येणार नाही. हे असे सभागृह आहे जिथे मला उभे राहून प्रामाणिकपणे सांगायचे आहे की, माझ्या समुदायातील लोक अभिमानी भारतीय आहेत. ही आमची मालमत्ता आहे, ती आम्हाला कोणीही दिलेली नाही. तुम्ही हे आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. वक्फ ही आमच्यासाठी एक प्रकारची उपासना आहे."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+