केजरीवालांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीची खूर्ची कोणाला मिळेल?, सुनीता, आतिशी की अन्य.., वाचा सविस्तर
Arvind Kejriwal, Delhi CM : आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी येत्या दोन दिवसांत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे रविवारी पक्षाच्या कार्यक्रमात जाहीर केले. केजरीवाल यांची शुक्रवारी तिहार तुरुंगातून जामिनावर सुटका झाली. जामीनासोबत अनेक अटी देखील घातल्या आहेत. ज्यात मुख्यमंत्री कार्यालयात न जाणे आणि मुख्यमंत्री म्हणून कोणत्याही सरकारी कागदपत्रावर सही न करणे आदी अटींचा समावेश आहे.
आगामी दोन दिवसांत राजीनामा देण्याची घोषणा करताना केजरीवाल म्हणाले की, जोपर्यंत लोक त्यांना "प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र" देत नाहीत तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार ते येत्या काही दिवसांत आप आमदारांची बैठक घेतील आणि पक्षातील एक नेता मुख्यमंत्रीपदी विराजमान केला जाईल. केजरीवालांच्या या निर्णयानंतर दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार यावर चर्चा रंगू लागली आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी, सौरभ भारद्वाज यांसारख्या अनेक नेत्यांच्या नावाचा अंदाज लावला जात आहे. चला तर जाणून घ्या, दिल्लीच्या संभाव्य मुख्यमंत्र्यांची नावाविषयी जाणून घेऊया...!
आतिशी - सध्या दिल्ली मंत्रिमंडळात महिला आणि बालविकास शिक्षण, पर्यटन, कला, संस्कृती आणि भाषा, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ऊर्जा या पाच खात्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य नावांमध्ये आतिशी यांचे नाव सर्वात प्रथमस्थानावर घेतले जात आहे.
सुनीता केजरीवाल - सक्रिय राजकारणापासून दूर असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी पती तुरुंगात गेल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यानंतर त्यांनी अनेक रॅली आणि जाहीर सभांनाही संबोधित केले आहे. त्यांच्याकडे सध्या कोणत्याही खात्याची जबाबदारी नसली तरी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत त्यांचे नावही पुढे येत आहे.
कैलाश गेहलोत - सध्या 8 विभाग हाताळत आहेत; कायदा, न्याय आणि विधिमंडळ व्यवहार, वाहतूक, प्रशासकीय सुधारणा, आयटी, महसूल, वित्त, नियोजन आणि गृह आणि इतर सर्व विभाग मंत्र्याला विशेषत: वाटप केलेले नाहीत.
सौरभ भारद्वाज - सध्या 7 विभाग हाताळत आहेत; दक्षता, सेवा, आरोग्य, उद्योग, शहरी विकास, सिंचन आणि पूर नियंत्रण आणि पाणी.
गोपाल राय - राय हे राष्ट्रीय राजधानीत विकास, सामान्य प्रशासन विभाग, पर्यावरण आणि वन्यजीव मंत्री आहेत.
इम्रान हुसेन - हुसैन हे दिल्लीतील अन्न आणि पुरवठा आणि निवडणूक विभागांवर देखरेख करतात. केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 'प्रामाणिक' असा टॅग मिळाल्यानंतर पुन्हा त्यांचे जुने पद दिले जाणार आहे.












Click it and Unblock the Notifications