कलाकाराच्या मृत्यूचा लाइव्ह VIDEO; स्टेजवर भांगडा करताना कोसळला अन् क्षणार्धात होत्याचे नव्हते...
Artist Live Death Video Goes Viral, Punjab News : पंजाबमधील पतियाळा येथील एका खासगी रिसॉर्टमध्ये स्टेजवर भांगडा डान्स करत असताना अचानक एका कलाकाराचा मृत्यू झाला. त्या लाईव्ह मृत्यूचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात कलाकार नाचत असताना अचानक कोसळला अन् त्याचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत बब्बू हा अनेक वर्षांपासून भांगडा पार्टीत काम करत होता. त्याला कोणत्याही प्रकारचा आजार देखील नव्हता, असे कुटुंबियांनी देखील सांगितले. परंतु बब्बू यांची अचानक कोसळून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

कलाकार बब्बू हा राजपुरा, पतियाळा येथील रहिवासी होता. बब्बू हा त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. त्याला 2 लहान मुलं आहेत. ही घटना मंगळवारी (7 जानेवारी) सकाळी घडली. हे लग्न पटियालाच्या राजपुरा येथील बेदी फार्म (रिसॉर्ट) येथे होते. यामध्ये स्थानिक भांगडा पार्टीला आमंत्रित करण्यात आले होते.
पटियाला में भांगड़ा करते हुए व्यक्ति की हार्ट अटैक से हुई मौत, दर्दनाक वीडियो वायरल... #patiyala #heartattack #viralvideo #indianews pic.twitter.com/wD0FJ1ZMzQ
— India News (@NetworkItv) January 8, 2025
20 सेकंदाच्या व्हिडिओत काय दिसते?
लग्न समारंभातील या घटनेचा सुमारे 20 सेकंदांचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये भांगडा पार्टीचे सदस्य मंचावर भांगडा सादर करत आहेत. तो पंजाबी गाण्यावर नाचतोय. काही वेळाने समोरच्या रांगेत भांगडा करणाऱ्या व्यक्तीला चक्कर येते आणि तो खाली पडतो. तो पडताच, बाकीचे कलाकार नाचणे थांबवतात आणि लगेच त्यांच्या जोडीदाराकडे धावतात. ते त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात. यावेळी भांगडा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक पार्टीत आले होते.
तोंडावर पाणी मारले, पण कलावंत जागा झालाच नाही
मिळालेल्या माहितीनुसार, बेशुद्ध होऊन खाली पडल्यानंतर लोकही त्याच्याकडे धावले. त्याच्यावर पाणी शिंपडून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांना तत्काळ गाडीत बसवून जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले नाही. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, यासाठी कोणताही वैद्यकीय अहवाल नाही.












Click it and Unblock the Notifications