PM मोदींच्या घरी आला नवीन पाहुणा; वासराचा लाड करताना व्हिडिओ शेअर, नाव ठेवलं 'दीपज्योती'
PM Narendra Modi Deepjyoti : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक अत्यंत आनंददायी प्रसंग घडला आहे. नरेंद्र मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ज्याबाबत त्यांनी नवीन पाहुण्याबाबत माहिती दिली आहे.
तो नवीन पाहुणा म्हणजे गायीचे वासरु असून ते त्याच्यासोबत खेळताना दिसले. सदर वासराचे नाव त्यांनी दीपज्योती असे ठेवले आहे. हा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
नरेंद्र मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "प्रिय माता गायीने एका नवीन वासराला जन्म दिला आहे, ज्याच्या कपाळावर प्रकाशाचे प्रतीक आहे. त्यामुळे त्याचे नाव 'दीपज्योती' ठेवले आहे."

वासराचे लाड करताना दिसले पीएम मोदी
नरेंद्र मोदींच्या व्हिडीओमध्ये, ते वासरूसोबत आनंदाने खेळताना आणि त्याला गळ्यात मिठी मारताना दिसतात. वासरूच्या गोडपणाच्या आनंदात मोदींच्या चेहऱ्यावर दिसणारा हसू, स्नेह आणि प्रेम हा सुसंगत अनुभव दर्शवतो. हा क्षण त्यांच्या जीवनातल्या एका सजीव आणि रमणीय प्रसंगाचे प्रतीक असल्याची प्रतिक्रिया देखील लोकांनी पोस्टवर दिली. या विशेष क्षणाने मोदींच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे. 'दीपज्योती'च्या रूपाने पंतप्रधानांच्या घरात एक नवा आनंद आणि उर्जेचा प्रसार झाला आहे.
हमारे शास्त्रों में कहा गया है - गाव: सर्वसुख प्रदा:'।
— Narendra Modi (@narendramodi) September 14, 2024
लोक कल्याण मार्ग पर प्रधानमंत्री आवास परिवार में एक नए सदस्य का शुभ आगमन हुआ है।
प्रधानमंत्री आवास में प्रिय गौ माता ने एक नव वत्सा को जन्म दिया है, जिसके मस्तक पर ज्योति का चिह्न है।
इसलिए, मैंने इसका नाम 'दीपज्योति'… pic.twitter.com/NhAJ4DDq8K
मोदी पोस्टमध्ये काय म्हणाले?
या पोस्टवर आनंद व्यक्त करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "आमच्या धर्मग्रंथात म्हटले आहे - गाव: सर्वसुख प्रदाह". त्यांनी सांगितले की लोक कल्याण मार्गावर असलेल्या कुटुंबात एक नवीन सदस्य शुभ रीतीने सामील झाला आहे. नवजात वासराच्या कपाळावर प्रकाशाची एक विशिष्ट खूण आहे, ज्यामुळे त्याला 'दीपज्योती' असे नाव देण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications