लेफ्टनंट कर्नल संतापले अन् विमानतळावरील 4 कर्मचाऱ्यांना धो-धो धुतले; मारहाणीचा थरारक Video!
army officer attacks spicejet staff video : श्रीनगर विमानतळावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लेफ्टनंट कर्नल रितेश कुमार सिंग नावाच्या एका लष्करी अधिकाऱ्याने स्पाइसजेटच्या चार कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे.
अतिरिक्त सामानावर शुल्क आकारण्याच्या वादातून सुरू झालेला हा वाद इतका वाढला की, त्यात कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली, ज्यात पाठीचा कणा फ्रॅक्चर होण्यासह जबडा मोडला. ही घटना 26 जुलै रोजी घडली होती, पण आता या घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे.

अतिरिक्त सामानावरून सुरू झाला वाद
स्पाइसजेटच्या माहितीनुसार, लेफ्टनंट कर्नल रितेश कुमार सिंग हे दिल्लीला जाणाऱ्या विमानासाठी (SG 386) चेक-इन करत होते. त्यांच्याकडे दोन केबिन बॅग होत्या, ज्यांचे वजन 16 किलो होते, तर परवानगी असलेली मर्यादा फक्त 7 किलो होती. जेव्हा ग्राउंड स्टाफने त्यांना अतिरिक्त शुल्काची मागणी केली, तेव्हा त्यांनी पैसे देण्यास नकार दिला आणि आक्रमक झाले.
Lt Colonel Assaults SpiceJet Staff at Srinagar Airport; FIR Registered After Spinal, Jaw Fractures pic.twitter.com/vxGt1TGvqp
— Kashmir Patriot (@KashmirPatriot) August 3, 2025
हल्ल्यात कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत!
ही घटना 26 जुलै रोजी घडली. स्पाइसजेटने दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्याने बोर्डिंग प्रक्रिया पूर्ण न करताच जबरदस्तीने एरोब्रिजमध्ये प्रवेश केला, जे सुरक्षा नियमांचे उल्लंघन आहे. सीआयएसएफ कर्मचाऱ्यांनी त्याला परत आणले, पण त्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली.
संतापलेल्या अधिकाऱ्याने स्टीलच्या साइनबोर्ड स्टँडने कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. यात चार कर्मचारी गंभीर जखमी झाले. एका कर्मचाऱ्याला मारहाण करून तो बेशुद्ध पडल्यानंतरही अधिकारी त्याला लाथा आणि मुक्क्या मारत होता. दुसऱ्या एका कर्मचाऱ्याला जबड्यावर जोरदार लाथ मारल्याने त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कायदेशीर कारवाई आणि पुढील पावले
या घटनेनंतर स्पाइसजेटने तातडीने कठोर पावले उचलली आहेत:
प्रथम एफआयआर दाखल : स्थानिक पोलिसांमध्ये लेफ्टनंट कर्नलविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
नो-फ्लाय लिस्ट : या अधिकाऱ्याला नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सीसीटीव्ही फुटेज : घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सादर करण्यात आले आहे. मंत्रालयाला पत्र: नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला कठोर कारवाईची मागणी करणारे पत्र पाठवण्यात आले आहे.
स्पाइसजेट काय म्हणाले?
स्पाइसजेटने म्हटले आहे की, "आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांवरील या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध करतो आणि हे प्रकरण कायदेशीररित्या अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचवू, नये अशी त्यांची मागणी आहे.
लष्कर अन् CISFची भूमिका!
लष्कराने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, चौकशीच्या निकालाची प्रतीक्षा करत आहे. शिस्त राखणे हे त्यांचे प्राधान्य असल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, सीआयएसएफने सांगितले की त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली, ज्यामुळे उड्डाण कार्यामध्ये कोणताही व्यत्यय आला नाही. या घटनेमुळे विमानतळांवर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा घटना रोखण्यासाठी कठोर नियमांची आणि त्यांच्या अंमलबजावणीची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.












Click it and Unblock the Notifications