एप्रिल फूलला काहीतरी युनिक करायचंय? मग या 25 आयडिया वाचा, आणि बिनधास्त कुणालाही वेड्यात काढा
एप्रिल फूल म्हटलं की, आपल्या मित्र-मैत्रिणींना वेड्यात काढायची चांगली संधी असते. अनेक आयडिया तुम्हाला तुमच्या सुपीक डोक्यातून लढवता येतात. आम्ही अशाच आठ आयडिया आज तुम्हाला सांगणार आहोत. त्या केल्या तर नक्कीच तुमचे मित्र- मैत्रिणी वेड्यात निघतील. मात्र मजा मस्करी करत असताना कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यायला विसरू नका.

एप्रिल फूलच्या काही आयडीया
१. तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही खालच्या जीभेने ओठाला स्पर्श करू शकत नाही. अर्थात हे वाचल्यावर 100 पैकी 99 लोक तसा प्रयत्न नक्कीच करतात. तुम्ही केला का असा प्रयत्न?
२. ....या प्रश्नाचे उत्तर द्या
तू अजूनही मूर्ख आहे का? होय की नाही
३. प्लीज मला लगेच फोन कर...अपघात झालाय. तुझाच ब्लड ग्रुप लागेल नाहीतर ते गाढव मरेल, असा संदेश मित्राला पाठवा.
४. खिडकीतून दोऱ्याला नोट लाऊन खाली सोडा. खोट्या नोटेला दोरा बांधा आणि वरच्या मजल्यावरून ती नोट खाली सोडा. काही माणसांना रस्त्यावर नोट पडली आहे असे वाटेल आणि उचलायला येतील. समोर व्यक्ती आल्यावर नोट खेचून मजा घ्या
५. ज्युसमध्ये कारल्याचा रस मिक्स करा. आपल्या घरी आपले मित्रमैत्रिणी येणार असतील तर ज्युस देताना त्यात कारल्याचा रस मिक्स करूनही तुम्ही देऊन त्यांची फजिती करू शकता
६. आपल्या घरातील व्यक्तींना सवय असते काही गोष्टींची पण एप्रिल फूलच्या दिवशी तुम्ही रोज लागणाऱ्या अशा वस्तूंची अदलाबदल ड्रॉव्हर्समधून करू शकता. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा गोंधळ उडेल आणि एप्रिल फूल करता येईल
७. एखाद्याला त्रास द्यायचा असेल तर तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या आवडीच्या व्यक्तीसह फेक फोटो बनवून घ्या आणि त्या व्यक्तीला एप्रिल फूल बनवा
८. पांढरे क्रिम असणाऱ्या बिस्किटामध्ये तुम्ही टूथपेस्ट घाला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना खायला द्या. एक घास खाल्ल्यानंतर त्यांचे तोंड बघण्यासारखे होईल आणि तुम्हाला मजा घेता येईल
९. संबंधित व्यक्तीला फोन करून पार्टीच्या नावाने रेस्टॉरंट, हॉटेल, पार्कमध्ये बोलवा आणि तुम्ही तिथं जाऊच नका. नंतर फोन करून त्याला एप्रिल फूल म्हणा.
१०. घरात एखादा रिकामा बॉक्स असेल तर तो पॅक करून त्यांच्या घरी पाठवा. तो रिकामाच पाठवा ती व्यक्ती बॉक्स खोलेल आणि त्यात काही नसेल. नंतर त्या व्यक्तीला फोन करून एप्रिल फूल म्हणा.
११. ती व्यक्ती तुमच्या सोबत असेल, तुम्हाला भेटणार असेल तर तिच्या नकळत जमीन किंवा टेबलवर वगैरे नाणं चिकटवून ठेवा. ती व्यक्ती ते उचलण्याचा प्रयत्न करेल आणि ते निघणार नाही तेव्हा एप्रिल फूल म्हणा.
१२. आता उन्हाळा आहे त्यामुळे बाहेरून कुणी घरी आलं तर आपण त्यांना कोल्ड ड्रिंक देतो. 1 एप्रिलला कुणी तुमच्या घरी आलं आणि त्याला एप्रिल फुल करायचं असेल तर या कोल्डड्रिंकऐवजी तुम्ही पाण्यात सोया सॉस मिक्स करून ते कोल्डड्रिंक म्हणून द्या.
१३. त्या व्यक्तीकडे गाडी असेल तर तिच्या गाडीच्या काचेवर ब्रोकन ग्लास स्टिकर चिकटवा. जेणेकरून त्या व्यक्तीला आपली गाडी फुटल्यासारखी वाटेल आणि ती व्यक्ती घाबरेल, टेन्शन घेईल. शेवटी तो स्टिकर हटवा आणि त्या व्यक्तीला एप्रिल फूल म्हणा.
१४. आपल्या आईची अथवा बहिणीची मजा करण्यासाठी फ्रीजमधील फळे आणि भाज्यांसह प्रत्येक गोष्टीवर गुगली डोळे लावा. ते पाहून त्यांना नक्कीच भीती वाटेल आणि त्यांची फजिती होईल.
१५. एखाद्या सेलिब्रेटी किंवा हाय-प्रोफाइल प्रोफेशनल व्यक्तीसोबत बनावट मीटिंग किंवा मुलाखत सेट करा आणि तुमचे ऑफिसचे कर्मचारी उत्तेजित होताना पहा. त्यानंतर जेव्हा त्यांना समजले की ही एप्रिल फूलची ट्रिक आहे तेव्हा त्यांची निराशा होईल.
१६. तुमच्या ऑफिसमधील सहकाऱ्याच्या मोबाईलची रिंगटोन अशा एखाद्या मजेदार किंवा लाजिरवाण्या म्युझिकने बदला की संपूर्ण ऑफिसमध्ये त्याचा मोठा पचका होईल आणि सगळे जण हसतील.
१७. ऑफिसच्या टॉयलेटच्या दरवाज्यावर 'OUT OF SERVICE' असा बोर्ड लावून ठेवा आणि तासा-दोन तासांनी लोकांची जी मजा होते, ती पाहत रहा.
१८. एखाद्याचे स्टेपलर किंवा इतर ऑफिसचं साहित्य लपवा आणि ते शोधण्याचा प्रयत्न करत असताना त्यांची फजिती पहा.
१९. मित्र किंवा कुटुंबातील सदस्याची फजिती करण्यासाठी एखादा प्रँक कॉल करा. मात्र, हा कॉल करताना व्हॉइस चेंजर वापरा, जेणेकरुन त्याला आवाज ओळखूनच येणार नाही.
२०. ऑफिसमधील सहकाऱ्याच्या शूजची लेस एकमेकांना बांधा. हे करणं थोडं आव्हानात्मक असेल मात्र, ते करण्याचं धाडस करा. एकदा तुम्ही हे केलंत की मग त्यानंतर त्याची मजा पहा.
२१. ऑफिसच्या एखाद्या सहकाऱ्याच्या पाठीवर 'I AM A DONKEY' असं लिहिलेला कागद चिकटवा आणि दिवसभर त्याची जी फजिती होईल ती पाहत रहा.
जाणून घ्या RRR चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्यातील 5 खास गोष्टी
२२. आपल्या ऑफिसच्या सहकाऱ्याचा माऊस काढून घ्या आणि तो लपवून ठेवा. त्यानंतर त्याची जी तारांबळ उडते, ती पाहत मजा घ्या.
२३. एखादं बनावट सोशल मीडिया अकाऊंट तयार करा आणि ऑफिसच्या सहकाऱ्याशी अथवा मित्राशी बोलत राहा आणि त्याची खेचत रहा अथवा मजा घेत रहा.
२४. एखादी व्यक्ती जर झोपलेली असेल तर तिच्या चेहऱ्यावर मार्करने बनावट मिशा काढा आणि तो व्यक्ती उठल्यानंतर त्याची मजा घ्या.
२५. एखाद्या व्यक्तीच्या शूजमध्ये टूथपेस्ट अथवा शॅम्पू भरुन ठेवा. जेव्हा तो त्याचे शूज घालेल, तेव्हा त्याची होणारी फजिती फक्त पाहत रहा.












Click it and Unblock the Notifications