अनंत कान्हेरे पुण्यतिथी : १८ व्या वर्षी फासावर चढणाऱ्या क्रांतीकारकाला शतशः नमन; पाठवा हे संदेश
२१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये एका १८ वर्षांच्या कोवळ्या मुलाने एका जिल्हाधिकार्याचा खून केला. १८ वर्षे हे वय हे खून करण्याचे नव्हते. पण भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी अनंत कान्हेरे आणि त्याचे साथीदार यांनी हे काम केले. आजच्याच दिवशी म्हणजेच १९ एप्रिल १९१० रोजी त्यांना फाशी झाली. हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या स्मृतीला वंदन...

१८९१ साली रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आयनी मेटे या छोट्याशा खेड्यात अनंत कान्हेरे यांचा जन्म झाला. छोटेसे खेडे, त्यात सुविधा त्या असणार तरी किती? अनंत शिक्षणासाठी बाहेर पडले. प्राथमिक शिक्षण इंदौर निजामबाद या गावी झाले. त्यानंतर ते आपल्या मामांकडे छत्रपती संभाजीनगरला इंग्रजी शिक्षण घेण्यास आले. अनंत आपल्या शिक्षणाबरोबरच चित्रकला हा विषयसुद्धा शिकत होते. अनंत यांनी त्यावेळी 'मित्रप्रेम' नावाची कादंबरी लिहिली.परंतु ते देशप्रेमाने प्रेरित झाले. २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिकचे जिल्हाधिकारी ए. एम. टी. जॅक्शन यांची त्यांनी हत्या केली. त्यानंतर त्यांना पकडण्यात आले व १९ एप्रिल १९१० रोजी फाशी देण्यात आली. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हे काही व्हाट्सअॅप संदेश आपण पाहूयात...

- ज्यांनी देशासाठी आपलं जीवन समर्पित केलं, त्यांच्या बलिदानाला विनम्र अभिवादन!
-देशासाठी शहीद झालेल्या वीरांना आदराने स्मरण करूया. हुतात्मा अनंत कान्हेरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
- आपल्या देशासाठी हुतात्मा झालेल्या वीरांना विनम्र अभिवादन! त्यांच्या बलिदानाला सलाम!
- आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांना आदराने स्मरण करूया.
- देशासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या वीरांना विनम्र अभिवादन!
-देशासाठी शहीद झालेल्या वीरांना आदराने स्मरण करूया. हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या स्मृतीस अभिवादन
- अनंत कान्हेरे पुण्यतिथी... देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांना विनम्र अभिवादन!

-देशासाठी शहीद झालेल्या वीरांच्या बलिदानाला सलाम! कान्हेरे यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन
- देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलेल्या वीरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!"
- हुतात्मा दिनाच्या निमित्ताने, आपल्या देशासाठी शहीद झालेल्या वीरांना विनम्र अभिवादन!
- आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकांच्या निःस्वार्थ बलिदानामुळे आपण आपले स्वातंत्र्य मिळवले आहे. अनंत कान्हेरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या शौर्याला आदरांजली वाहूया.
- देशाच्या स्वातंत्र्यासाठी मृत्यूला कवटाळणाऱ्या अनंत कान्हेरे यांना श्रद्धांजली. त्यांचे धाडस आपल्याला कायम प्रेरणा देईल.
- भारताच्या शूर शहीदांना सलाम! त्यांचा वारसा आपल्याला नेहमीच एका न्याय्य आणि स्वतंत्र राष्ट्राकडे नेईल. जय भारत!
- इन्कलाब जिंदाबाद!
- ते मला मारू शकतात, पण ते माझे विचार मारू शकत नाहीत. ते माझे शरीर चिरडू शकतात, पण ते माझ्या आत्म्याला कधीही चिरडू शकणार नाहीत. - भगत सिंह
- खरी देशभक्ती केवळ शब्दात नाही तर कृतीत आहे. - सुखदेव थापर
- दुश्मन की गोलियों का हम सामना करेंगे, आझाद ही रहेंगे, आझाद ही रहेंगे! - चंद्रशेखर आझाद












Click it and Unblock the Notifications