Amarnath Yatra 2025 : अमरनाथ यात्रेच्या नोंदणीला आजपासून सुरुवात; कुठे, कशी करावी नोंदणी? जाणून घ्या
Amarnath Yatra 2025 Registration Starts Today : अमरनाथ यात्रा ही भारतातील सर्वात महत्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. भोलेनाथाचे दर्शनासाठी आसुलेल्या भाविकांना जम्मू आणि काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुहेत देशातून लाखो भाविक येतात. या धार्मिक यात्रेत यंदाच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी, नोंदणी प्रक्रिया अगोदर पूर्ण करणे अनिवार्य आहे.जी आता सुरु झाली आहे.
अमरनाथ भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यातील पवित्र तीर्थस्थळ असून येथे नैसर्गिक गुहा आहे. ही गुहा जम्मू-काश्मीर राज्यामध्ये असून श्रीनगर पासून साधारणपणे 135 किमी वर समुद्रसपाटी पासून 13600 फूट उंचीवर आहे. येथील गुहेमध्ये बर्फाचे शिवलिंग तयार होते. ते पहायला दरवर्षी उन्हाळ्यात हजारो- लाखो भाविक येथे भेट देतात. हे शिवलिंग साधारणपणे 8 ते 10 फूट उंचीचे असते परंतु लिंगाचा आकार हवामानाप्रमाणे कमी जास्त होत असतो. असेही मानले जाते की शिवलिंगाचा आकार चंद्राच्या कलेप्रमाणे कमी जास्त होत असतो. गुहे मध्ये अजून काही लहान हिमखंड आहेत त्यांना गणेश -पार्वतीचे रूप समजले जाते.

विकिपीडियानुसार, या ठिकाणचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पवित्र गुहेत बर्फामुळे नैसर्गिक शिवलिंग तयार होणे हे आहे. नैसर्गिक बर्फापासून निर्माण झाल्यामुळे त्याला स्वयंभू हिमानी शिवलिंग असेही म्हणतात. संपूर्ण श्रावण महिन्यात आषाढ पौर्णिमेपासून रक्षाबंधन पवित्र हिमालिंग दर्शनासाठी लाखो लोक येथे येतात. त्या गुहेचा परिघ सुमारे दीडशे फूट आहे आणि त्यातून वरून बर्फाच्या पाण्याचे थेंब पडतात. येथे एक ठिकाण आहे, ज्यामध्ये बर्फाच्या थेंबापासून दहा फूट लांब शिवलिंग तयार होते.
अमरनाथ यात्रा
जम्मू-काश्मीर राज्यातील हा भाग अतिरेकी कारवायांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. काश्मीरमधील दहशतवादी कारवाया ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर होत्या (९० च्या दशकात) त्यावेळेस ही यात्रा जवळपास स्थगित झाली होती. परंतु भारतीय सरकार व लष्कराच्या मदतीने ही यात्रा पुन्हा सुरू करण्यास यश आले आहे व दरवर्षी येथे भेट देणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.
नोंदणी सुरु, शेवटची तारीख काय?
अमरनाथ यात्रेसाठी या वर्षी, नोंदणी अधिकृतपणे सुरू झाली आहे आणि अधिकृत बँका आणि श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड (SASB) च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही उपलब्ध आहे. यात्रा 25 जुलै 2025 रोजी सुरू होईल आणि 19 ऑगस्ट 2025 पर्यंत चालेल, तर नोंदणी 14 एप्रिल 2025 पासून सुरू होईल. मर्यादित संख्येने यात्रेकरूंना - दररोज सुमारे 15,000 - सहभागी होण्याची परवानगी आहे.
अमरनाथ यात्रे 2025 च्या प्रमुख तारखा
- अमरनाथ यात्रा सुरू: 25 जुलै 2025
- नोंदणी सुरू: 14 एप्रिल 2025
- अमरनाथ यात्रा समाप्त: 19 ऑगस्ट 2025
- चरण-दर-चरण ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया
अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी कशी करायची?
- अधिकृत श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड (SASB) वेबसाइटला भेट द्या आणि शीर्ष मेनूमधील "ऑनलाइन सेवा" वर क्लिक करा.
- सुचीतील "यात्रा परमिट नोंदणी" हा पर्याय निवडा.
- सर्व मार्गदर्शक तत्त्वे वाचा, काय करावे आणि करू नये. एकदा पूर्ण झाल्यावर, "मी सहमत आहे" वर क्लिक करा आणि नंतर "नोंदणी करा" निवडा.
- तुमचे वैयक्तिक तपशील भरा, जसे की नाव, यात्रेची तारीख, मोबाइल नंबर, आधार क्रमांक इ. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि तुमच्या अनिवार्य आहे.
- आरोग्य प्रमाणपत्राची (CHC) स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
- तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर पाठवलेला OTP वापरून तुमचा मोबाईल नंबर सत्यापित करा.
- दोन तासांच्या आत, तुम्हाला पेमेंट लिंक मिळेल. नोंदणी शुल्क भरा (अंदाजे ₹220 शुल्क असू शकते यात बदलाची शक्यता असू शकते)
- यशस्वी पेमेंट केल्यानंतर, तुम्ही पोर्टलवरून तुमची यात्रा नोंदणी परमिट डाउनलोड करू शकता.
- हे टप्पे पूर्ण करून, तुम्ही अधिकृत परमिट घेऊन पवित्र अमरनाथ यात्रेला निघण्यास तयार असाल.












Click it and Unblock the Notifications