मोठी बातमी! एअर इंडियाचे विमान घसरले..! टेकऑफवेळी तांत्रिक बिघाड, मोठा अनर्थ टळला
Air india flight ai504 kochi delhi face technical issue : एअर इंडिया विमानाशी संबंधित अपघाताचे प्रकार थांबता थांबेना..अशी स्थिती आहे. वनइंडिया हिंदीच्या वृत्तानुसार, रविवारी कोचीहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरुन घसरल्याची घटना घडली. या विमानात काँग्रेस खासदार होते. तांत्रिक कारणांमुळे या विमानात खराब आली, या घटनेनंतर AI504 सह दोन उड्डाणे रद्द करण्यात आली. तर दुसरीकडे काँग्रेस खासदाराने विमान घसरल्याचा अनुभव आल्याचे म्हटले आहे.

अहमदाबाद दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या विमावसेवेबद्दल प्रवासी फारच संवेदनशिल झाले आहेत. तर दुसरीकडे एअर इंडियाच्या विमानात कधीकधी तांत्रिक बिघाड, त्यामुळे किरकोळ अपघात किंवा आपत्कालीन लँडिंगच्या घटना घडल्या आहेत. तर कधीकधी उड्डाण रद्द करण्याची वेळही आली. रविवारी एअर इंडियाच्या दोन विमानांमध्ये पुन्हा तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. यामुळे ही उड्डाणे रद्द करावी लागली.
पहिले विमान कोचीहून दिल्लीला येत होते, या विमानात काँग्रेस खासदार हिबी एडन हेही होते. सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर करताना त्यांनी सांगितले की त्यांना असे वाटले की विमान धावपट्टीवरून घसरत आहे. त्याचवेळी, दुसरे विमान मिलानहून दिल्लीला येणार होते, जे रात्री उशिरा रद्द करण्यात आले. या घटनेमुळे प्रवाशांची खूप गैरसोय झाली.
काँग्रेस खासदार म्हणाले विमान घसरल्याचा अनुभव, X वर पोस्ट?
Something unusual with this flight ✈️ AI 504, it just felt like the flight skid on the runway and hasn't taken off yet. Air India cancelled AI 504 and announced a new flight at 1 am which hasn't still started boarding, today is the third flight which has been AOG
— Hibi Eden (@HibiEden) August 17, 2025
एर्नाकुलम लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार हिबी एडन यांनी आपल्या अनुभवाबद्दल एक्सवर पोस्ट केली आहे. ते म्हणाले, "या फ्लाइटमध्ये काहीतरी असामान्य आहे ✈️ AI 504, असं वाटलं की फ्लाइट धावपट्टीवरून घसरली आहे आणि अजून उड्डाण घेतलेले नाही. एअर इंडियाने AI 504 रद्द केले आणि पहाटे 1 वाजता नवीन फ्लाइटची घोषणा केली जी अद्याप बोर्डिंग सुरू झालेली नाही, आज तिसरी फ्लाइट आहे जी AOG आहे."
एअर इंडियाचे प्रवक्ते काय म्हणाले?
एअर इंडियाचे प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले की, रविवार, १७ ऑगस्ट रोजी कोचीहून दिल्लीला जाणारी AI-504 हे विमान उड्डाणादरम्यान आढळून आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे उशिराने उड्डाण थांबवण्यात आले. कॉकपिट क्रूने एसओपी-मानक कार्यपद्धतींचे पालन करून उड्डाण थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विमान तपासणीसाठी परत नेले. त्यानंतर, सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आणि उड्डाणासाठी पर्यायी विमान तैनात करण्यात आले.
Flight AI504 operating from Kochi to Delhi on Sunday, 17 August, was delayed due to a technical issue detected during the take-off roll. The cockpit crew decided to discontinue the take-off run, following Standard Operating Procedures and brought the aircraft back to the bay for… pic.twitter.com/cYqhz55gh6
— ANI (@ANI) August 18, 2025
हेही वाचा : एअर इंडियाचं दुर्दैव! २४ तासांत दुसरा अपघात; दिल्ली विमानतळावर विमानात आग, कारण काय?
-
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
Horoscope Today March 12, 2026 Marathi : गुरुवार ठरणार प्रगतीचा दिवस; वाचा तुमच्या राशीत काय आहे खास -
IPL 2026 Schedule: आयपीएलचे 15 दिवसांचे वेळापत्रक समजून घ्या; पहिल्या सामना RCB Vs हैदराबाद









Click it and Unblock the Notifications