Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Passenger List :अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातात 242 जणांचा मृत्यू; कोण कुठून आले होते?

Air india Plane Crash Ahmedabad : 12 जून 2025 वार गुरुवारी दुपारी गुजरातमधील अहमदाबाद विमानतळाजवळील मेघनानी नगर परिसरात एअर इंडियाच्या विमान बोईंग ७८७ कोसळले, यात 242 जणांचा समावेश होता. यात 12 क्रू मेंबर्ससह 242 लोक होते. आतापर्यंत या अपघातातून फक्त एकच प्रवासी बचावला आहे. इतर सर्व 241 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

विमानाच्या ११-ए क्रमांकाच्या सीटवर बसलेले भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक रमेश विश्वास कुमार हे अपघातातून बचावले आहेत. त्यांचा व्हिडिओही समोर आला आहे.

यापूर्वी, एएनआय या वृत्तसंस्थेने पोलिस आयुक्तांच्या हवाल्याने सांगितले होते की, आणखी एका व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही वेळापूर्वी एपी ने म्हटले होते की विमानातील सर्व लोकांचा मृत्यू झाला आहे.

गुजरात पोलिसांचे अहमदाबाद आयुक्त जीएस मलिक यांच्या हवाल्याने वृत्तसंस्था एपीने याची पुष्टी केली आहे. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे.

all 242 dead in air india

Air India Passenger Name List : कुठून विमानात किती लोक होते?

एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलाइनरच्या या अपघातात एकूण १६९ भारतीय आणि ५३ ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, विमानात ७ पोर्तुगीज, १ कॅनेडियन नागरिक, २ पायलट आणि १० क्रू मेंबर्स होते. हे विमान अहमदाबादहून लंडनमधील गॅटविक विमानतळावर निघाले.

विजय रुपानी यांच्या मृत्यूची पुष्टी

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या मृत्यूची पुष्टी भाजपचे राज्यसभा खासदार परिमल नाथवानी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून केली, जरी त्यांनी काही वेळातच ती पोस्ट डिलीट केली. विमान अपघातानंतर विजय रुपानी यांच्या विमानाचे तिकीट आणि अहमदाबाद विमानतळावरील बोर्डिंग पासची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रुपानी विमानात सीट क्रमांक 2D वर बसले होते.

अहमदाबाद विमान अपघात कसा झाला?

एअर इंडियाचे विमान AI-171 12 जून 2025 रोजी दुपारी 1:38 वाजता लंडनसाठी उड्डाण करत होते. 625 फूट उंचीवर पोहोचल्यानंतर, दुपारी 1:40 वाजता विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि ते अहमदाबाद विमानतळ, एअर कस्टम कार्गो ऑफिस आणि निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या भिंतीवर आदळले.

25 मृतांची यादी जाहीर

वृत्तसंस्था ANI नुसार, अहमदाबाद पोलिसांनी अहमदाबादमधील विमान अपघातात जखमी झालेल्या 25 जणांची यादी जारी केली आहे. "विमान ज्या भागात कोसळले त्या भागात अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमधील विद्यार्थी वसतिगृहे, कर्मचारी निवासस्थाने आणि इतर निवासी क्षेत्रे आहेत. जखमींपैकी सुमारे 50 जणांना अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहे," असे गुजरात आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+