सर्वात मोठी बातमी ! 242 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान अहमदाबादमध्ये कोसळलं

गुजरातमधील अहमदाबाद शहरात आज एक धक्कादायक घटना घडली आहे. शहराच्या मेघानीनगर परिसरात एअर इंडियाचं एक प्रवासी विमान अचानक कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे.

ahmedabad plane crash


प्राथमिक माहितीनुसार, या विमानात एकूण 242 प्रवासी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विमान कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू असून, स्थानिक प्रशासनही सतर्क झालं आहे.

अद्याप या दुर्घटनेचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नसून, तांत्रिक बिघाड की अन्य कोणती कारणं जबाबदार आहेत, याचा तपास सुरू आहे. विमान दुर्घटना झालेलं ठिकाण हे गर्दीचा वस्ती असलेला रहिवासी भाग असल्याने संभाव्य जीवितहानीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

आपत्कालीन यंत्रणा, पोलिस, आरोग्य कर्मचारी आणि बचाव पथक या ठिकाणी पोहोचले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

घटनास्थळावरून मिळणाऱ्या माहितीनुसार, अद्याप कोणत्याही प्रकारच्या जखमी किंवा मृत्यू झालेल्यांची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. प्रशासनाकडून अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा केली जात आहे.

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सोशल मीडियावरही ही घटना वेगाने व्हायरल होत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+