Video : 'मला माहित नाही मी कसा वाचलो', PM मोदींनी घेतली विमान अपघातातून वाचलेल्या रमेश यांची भेट!
Ramesh Viswash kumar Video, PM narendra Modi : अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI171 कोसळले, ज्यामध्ये 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. परंतु या भयानक दुर्घटनेत, आशेचा आणि दिलासाचा किरण म्हणून एक नाव पुढे आले, ते म्हणजे रमेश विश्वास कुमार.
भारतीय वंशाचे 40 वर्षीय ब्रिटिश नागरिक विश्वास हे एअर इंडियाच्या विमान अपघातातून वाचल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 13 जून रोजी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रमेश विश्वास कुमार यांची भेट घेतली आहे.

अपघातातून वाचलेले रमेश विश्वास कुमार काय म्हणाले?
डीडी न्यूजनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमेश विश्वास कुमार यांच्याशी बोलून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. पंतप्रधान मोदींनी विचारले की हा अपघात कसा झाला. उत्तर देताना रमेश म्हणाले की, "मी विमानाच्या 11 A सीटवर बसलो होतो. मी कसा वाचलो हे मला माहित नाही. माझ्या डोळ्यासमोर सर्व काही घडले...
#WATCH | DD News held an exclusive conversation with #Vishwashkumar, the only survivor of the Ahmedabad plane crash.#planecrashahmedabad #AirIndiaFlightCrash |@neerajddnews pic.twitter.com/tGD2VOVFkr
— DD News (@DDNewslive) June 13, 2025
मी कसे जगलो हे मला स्वत:लाही देखील माहिती नाही. क्षणभर मला वाटले की मीही मरणार आहे. पण जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी जिवंत आहे. म्हणून मी प्रयत्न केला, मला वाटले की मी जगू शकेन, मी माझा सीट बेल्ट काढला आणि तिथून बाहेर पडलो.
रमेश विश्वास कुमारांनी सांगितले ते बाहेर कसे पडले?
रमेश विश्वास कुमार डीडी न्यूजशी बोलताना म्हणाले की, मी ज्या बाजूला बसलो होतो ती बाजू हॉस्टेलवर उतरली नाही. माझ्या विमानाचा भाग... खाली पडला होता. मला इतरांबद्दल माहिती नाही, मी ज्या बाजूला उतरलो होतो ती बाजू... खालची बाजू होती. माझा दरवाजा तुटताच मला दिसले की समोर काही रिकामी जागा आहे... म्हणून मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि मी बाहेर पडलो.
दुसऱ्या बाजूला एक भिंत होती, कदाचित तिथून कोणीही बाहेर पडू शकले नाही. मला माहित नाही की मी कसे वाचलो... दोन एअर होस्टेस, एक काका-काकी आणि माझ्या डोळ्यांसमोर सर्व काही जळत होते. मी तिथून बाहेर पडलो. आगीमुळे माझा डावा हात भाजला होता.
रमेश विश्वास कुमार कोण आहे? - Who is Ramesh Vishwas kumar?
रमेश विश्वास कुमार हा 40 वर्षांचा भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक आहे, जो भारतात त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आला होता. तो त्याचा 45 वर्षीय भाऊ अजय कुमार रमेशसोबत युकेला परतत होता.
विश्वास फ्लाइटमध्ये 11A क्रमांकाच्या सीटवर बसला होता, तर त्याचा भाऊ दुसऱ्या रांगेत होता. त्याच्या भावाचे या अपघातात निधन झाले.
-
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क!









Click it and Unblock the Notifications