अदानी समूह महाकुंभमेळ्यात कमवणार पुण्य; रोजच्या मोफत महाप्रसादसोबत आरतीसंग्रहही वाटणार
MahaKumbh Mela 2025 : महाकुंभ मेळा 2025 प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. हा मेळा थेट 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या सुमारे सव्वा महिन्यांच्या काळात महाकुंभमेळ्याला सुमारे 40 कोटी भाविक येण्याची अपेक्षा आहे. भाविकांची हिच गर्दी लक्षात घेता, उद्योगपती गौतम अदानी यांचा अदानी समूह या सोहळ्यात पुण्य कमाविण्याच्या तयारीत आहे. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (इस्कॉन) सोबत करार करत अदानी समूह दररोज सुमारे 1 लाख भाविकांना महाप्रसाद सेवा देणार आहे.

2500 स्वयंसेवक करणार प्रसाद
उत्तर प्रदेशातील महाकुंभ मेळ्यात अदानी समुहातर्फे 18,000 स्वच्छता कर्मचारी राहणार आहेत. याशिवाय हायटेक सुविधांनी सुसज्ज असलेल्या दोन स्वयंपाकघरात 2500 स्वयंसेवक दररोज प्रसाद तयार करणार आहेत.
कुंभ सेवा की वो तपोभूमि है जहां हर हाथ स्वतः ही परमार्थ में जुट जाता है!
— Gautam Adani (@gautam_adani) January 9, 2025
यह मेरा सौभाग्य है कि महाकुम्भ में हम @IskconInc के साथ मिलकर श्रद्धालुओं के लिए ‘महाप्रसाद सेवा’ आरम्भ कर रहे हैं, जिसमें मां अन्नपूर्णा के आशीर्वाद से लाखों लोगों को निःशुल्क भोजन उपलब्ध कराया जाएगा।
इस… pic.twitter.com/0DMlzO56hY
काय देणार प्रसादात?
अदानी ग्रुपतर्फे देण्यात येणाऱ्या महाप्रसादात रोटी, डाळ, भात, भाजी आणि मिठाईचा समावेश असेल. हा प्रसाद पानांपासून बनवलेल्या इको फ्रेंडली ताटांवर भाविकांना दिला जाणार आहे. यासाठी चाळीस वाटप केंद्र निश्चित करण्यात आले असून, तेथे भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाणार आहे. एवढेच नाही तर या मेळ्यात येणारे दिव्यांग, वृद्ध आणि लहान मुले यांच्यासाठी अदानी समूहातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी गोल्फ कार्टचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
#WATCH | Ahmedabad, Gujarat: Adani Group Chairman, Gautam Adani met Guru Prasad Swami Maharaj, Chairman, Governing Body Commission of ISKCON today.
— ANI (@ANI) January 9, 2025
The Adani Group and ISKCON have joined hands to serve meals to devotees at the Maha Kumbh Mela in Prayagraj this year. The… pic.twitter.com/AdQmoplZ7a
एक कोटी आरती संग्रह वाटणार
महाप्रसाद सेवेव्यतिरिक्त, गौतम अदानी यांच्या समूहाने गोरखपूर मुख्यालय गीता प्रेसलाही सहकार्य केले आहे. अदानी ग्रुपने त्यांच्याकडून आरती संग्रहाच्या सुमारे 1 कोटी प्रती छापल्या आहेत. या आरती संग्रहात भगवान शिव, गणेश, विष्णू, दुर्गा-लक्ष्मी आणि इतर देवतांना समर्पित भजन किंवा आरत्या समाविष्ट आहेत. हा संग्रह महाकुंभमेळ्यात भाविकांना मोफत वाटण्यात येणार आहे.
काय म्हणाले गौतम अदानी?
या उपक्रमाबद्दल इस्कॉनचे आभार मानण्यासाठी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी गुरुवारी इस्कॉन गव्हर्निंग बॉडी कमिशनचे (GBC) अध्यक्ष गुरु प्रसाद स्वामी यांची भेट घेतली. महाप्रसाद सेवेसाठी इस्कॉनच्या पाठिंब्याबद्दल बोलताना अदानी म्हणाले, "कुंभ हे सेवेचे पवित्र स्थान आहे. जिथे प्रत्येक भक्त देवाच्या सेवेच्या नामस्मरणात गुंततो. हे माझे भाग्य आहे की आम्ही 'महाप्रसाद सेवा' सुरू करत आहोत. इस्कॉनच्या सहकार्याने महाकुंभातील भाविकांसाठी माँ अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने लाखो भाविकांना मोफत भोजन दिले जाईल. आज मला इस्कॉनचे गुरु प्रसाद स्वामी जी यांना भेटण्याची संधी मिळाली आणि सेवेतील समर्पणाची शक्ती मी मनापासून अनुभवली. खऱ्या अर्थाने सेवा म्हणजे सेवा होय. देशभक्तीचे सर्वोच्च रूप म्हणजे ध्यान, सेवा म्हणजे प्रार्थना आणि सेवा म्हणजे ईश्वर." अशी प्रतिक्रीया अदानी यांनी दिली.
इस्काॅनने मानले आभार
इंटरनॅशनल कृष्णा चेतना सोसायटीचे गुरु प्रसाद स्वामी म्हणाले, "अदानी समूह नेहमीच कॉर्पोरेट जबाबदारी आणि सामाजिक सेवेचे भान ठेवतो. गौतम अदानी यांना उत्कृष्ट बनवणारी गोष्ट म्हणजे त्यांची नम्रता आहे. ते कधीही वाट पाहत नाहीत. निःस्वार्थपणे सेवा करण्यासाठी त्यांच्या मानवता धर्माचे आम्ही आभारी आहोत." अशा भावना गुरु प्रसाद स्वामी यांनी व्यक्त केल्या.












Click it and Unblock the Notifications