अदानी स्किल्स अँड एज्युकेशनने सुरू केला 'कर्म शिक्षा' कार्यक्रम
अदानी ग्रुपची कौशल्य विकास शाखा, अदानी स्किल्स अँड एज्युकेशन (ASE) ने आज 'कर्म शिक्षा' या वर्क-स्टडी डिप्लोमा कार्यक्रमाची सुरुवात केली. हा कार्यक्रम कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या (MSDE) अखत्यारीतील नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (NCVET) द्वारे मान्यताप्राप्त आहे.

'कर्म शिक्षा' हा कार्यक्रम दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या (सर्व शाखा) विद्यार्थ्यांसाठी, तसेच आयटीआय (ITI) पदवीधरांसाठी तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश त्यांना उद्योगांशी संबंधित, नोकरीसाठी तयार शिक्षण देणे आहे. यात विद्यार्थ्यांना अदानीच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये - बंदरे, ऊर्जा, सौर उत्पादन, ग्रीन एनर्जी आणि लॉजिस्टिक्स - वर्गात शिकण्यासोबतच प्रत्यक्ष कामाचा अनुभवही मिळेल.
या प्रसंगी बोलताना अदानी ग्रुपचे अध्यक्ष, गौतम अदानी म्हणाले, "कर्म शिक्षेच्या माध्यमातून आम्ही एक परिवर्तनकारी पाऊल उचलत आहोत. यातून विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे, तर असे व्यावहारिक कौशल्ये मिळतील, ज्यामुळे त्यांच्यासाठी संधीचे नवे मार्ग खुले होतील. आमचे 'हम करके दिखाते है' हे तत्त्वज्ञान या उपक्रमातून प्रत्यक्षात उतरत आहे. यातून आम्ही नवीन पिढीला विकसित भारत घडवण्यासाठी अर्थपूर्ण योगदान देण्यास सक्षम करत आहोत."
कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये
- राष्ट्रीय स्तरावर गुणवत्ता आधारित निवड: देशभरातील विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार केली जाईल.
- दोन वर्षांचा वर्क-स्टडी डिप्लोमा: बंदरे व्यवस्थापन आणि लॉजिस्टिक्स व्यवस्थापनामध्ये दोन वर्षांचा डिप्लोमा.
- एनसीव्हीईटीची मान्यता: अदानी स्किल्स अँड एज्युकेशनसोबत संयुक्तपणे एनसीव्हीईटीद्वारे प्रमाणित.
- अनेक क्षेत्रांचा अनुभव: उद्योगाशी संबंधित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये अनुभव मिळेल.
- आकर्षक मानधन: शिक्षण सुरू असताना विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी आकर्षक मानधन दिले जाईल.
- उच्च शिक्षणाचे मार्ग: या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना थेट पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची संधी मिळेल.
'कर्म शिक्षा' कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना 'कमवा आणि शिका' या तत्त्वाचा लाभ मिळेल, ज्यामुळे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल. हा डिप्लोमा राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असून, तो विद्यार्थ्यांना नोकरी तसेच उच्च शिक्षणाचे मार्ग उपलब्ध करून देईल. यामुळे विद्यार्थी स्थिर आणि दीर्घकालीन करिअर घडवू शकतील.
अदानी स्किल्स अँड एज्युकेशनचे सीईओ, रॉबिन भौमिक म्हणाले, "कर्म शिक्षा' हा केवळ एक डिप्लोमा नसून, तो संधीचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. 'स्किल2एम्प्लॉय' या आमच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, आम्ही प्रत्येक कौशल्याला रोजगाराशी जोडत आहोत, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी भारताच्या विकासात योगदान देईल. शैक्षणिक आणि कामाच्या अनुभवाचे एकत्रीकरण करून, आम्ही भविष्यासाठी तयार उद्योगांसाठी पात्र व्यावसायिकांची निर्मिती करत आहोत."












Click it and Unblock the Notifications