प्रसिद्ध अभिनेत्रीला मंदिरात जाण्यापासून रोखले, हिंदू असल्याचा पुरावा मागितला
प्रसिद्ध अभिनेत्री आणि राजकीय व्यक्तिमत्व नमिता वांकावालाने धक्कादायक खुलासा केला आहे. तिच्या खुलाशामुळे खळबळ माजली आहे. अभिनेत्रीने तामिळनाडूतील मदुराई येथील प्रसिद्ध मीनाक्षी अम्मन मंदिरात तिच्यासोबत भेदभाव झाल्याची पोस्ट शेअर करत रोष व्यक्त केला आहे.
मीनाक्षी अम्मन मंदिरात नमिता वाकांवालासोबत भेदभाव
नमिताने आता सोशल मीडियावर प्लॅटफाॅर्म इन्स्टाग्राम हॅंडल वर व्हिडिओ शेअर करत आरोप केला आहे की, तिला आणि तिच्या पतीला मीनाक्षी अम्मान मंदिरात प्रवेश दिला गेला नाही. मंदिराच्या अधिकाऱ्यांनी अभिनेत्री आणि तिच्या पतीला बाहेर थांबवले. एवढेच नाही तर या दोघांकडून हिंदू असल्याचा पुरावाही मागितला होता. मंदिरात देवाचे दर्शन घेण्यापूर्वी तिला कुंकू लावण्यासही सांगण्यात आल्याचा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.

जात आणि धर्माचे प्रमाणपत्र मागितले
नमिता इतकी संतापली आहे की तिने आता आपल्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या मंदिर अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. या तिने हिंदू धर्मकल्याण मंत्री शेखर बाबू यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. नमिताने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, काल सकाळी तिला आणि तिच्या पतीला मंदिरात जाण्याची परवानगी मिळाली नाही. हिंदू धार्मिक आणि धर्मादाय एंडॉमेंट्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून जात आणि धर्माचे दाखलेही मागितले. मंदिरात त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आले.
अभिनेत्रीचा दावा आहे की, मंदिरात तिच्यासोबत भेदभाव झाला आहे. आता तिने सांगितले आहे की, तिचे लग्न तिरुपतीमध्ये झाले आहे आणि तिच्या मुलाचे नाव देखील कृष्णाच्या नावावर ठेवण्यात आले आहे. तरीही मंदिरांत अशा प्रकारच्या घटना होत आहेत. ती म्हणाली की, 'मुद्दा असा नाही की मला याबद्दल विचारले गेले, तर मुद्दा हा आहे की मला याबद्दल कसे विचारले गेले? अधिकारी आणि सहाय्यक अतिशय उद्धट आणि गर्विष्ठ होते.' नमिताने IS पोलिसांच्या टीमचे आभार मानले आहेत ज्यांनी तिला आणि तिच्या पतीला सुखरूप दर्शन घेण्यासाठी आणि घरी परतण्यास मदत केली.












Click it and Unblock the Notifications