'या' तारखेच्या पूर्वी जे पेन्शनधारक कर्मचारी निवृत्त होतील त्यांना नाही मिळणार आठवा वेतन आयोग लाभ?

8th Pay Commission Latest News : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी आहे. आठवा वेतन आयोग लवकरच लागू होण्याची शक्यता आहे.

ज्याचा फायदा सुमारे 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना होईल. यामुळे त्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते. दरम्यान, नुकतेच असे वृत्त समोर आले की, हा आठवा वेतन आयोग कोणाला लागू होणार आणि कोणाला नाही, याबाबत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.

निवृत्तीबाबत दोन वर्ग केले जाणार?

मिळालेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त होणाऱ्या पेन्शनधारकांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला.

काही माध्यमांच्या अहवालांनुसार, सरकार पेन्शनधारकांना दोन भागात विभागेल. 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त झालेले आणि दुसरे त्यानंतर निवृत्त होणारे कर्मचारी यांच्यात विभागणी केली जाणार आहे. त्यावरुन आठव्या वेतन आयोगाबाबत लागू करण्याचा निर्णय होणार आहे.

8th Pay Commission

निर्मला सीतारामन यांनी काय विधान केले होते?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राज्यसभेत बोलताना सांगितले की, पेन्शनधारकांना घाबरण्याची गरज नाही. त्यांनी स्पष्ट केले की, वित्त विधेयकात केलेले बदल केवळ जुन्या नियमांच्या वैधतेसाठी आहेत. यामुळे पेन्शन लाभांमध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही. सर्व पेन्शनधारकांना सातव्या वेतन आयोगात समान लाभ मिळाले आहेत, मग ते निवृत्त झाल्याची तारीख काहीही असो.

आठव्या वेतन आयोगाबाबत काय धोरण असणार?

निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत बोलताना एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली आहे. त्या म्हणाल्या की, सहाव्या वेतन आयोगात निश्चितच फरक होता, परंतु सातव्या वेतन आयोगात सर्व पेन्शनधारकांना समान पेन्शन देण्यात आली. कोणताही कर्मचारी किंवा पेन्शनधारक मागे राहू नये म्हणून आठव्या वेतन आयोगातही हेच धोरण स्वीकारले जाईल.

काय आहे फिटमेंट फॅक्टर, ज्याचा वेतनावर कसा परिणाम होणार?

एकीकडे आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू असताना दुसरीकडे यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फिटमेंट फॅक्टरबाबत चर्चा जोरात सुरू आहेत. तज्ञांच्या मते, ते 2.00, 2.08 किंवा 2.86 पर्यंत असू शकते. जर विधेयक 2.00 मंजूर झाले तर किमान वेतन 18000 रुपयांवरून 36,000 रुपये होईल आणि पेन्शन 9 हजारांवरुन 18 हजार रुपये होईल.

सरकारकडून असे संकेत मिळाले आहेत की आठवा वेतन आयोग कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांसाठीही फायदेशीर ठरेल. आता सरकार ते कधी लागू करते आणि पगार किती वाढवते याकडे सर्वांच्या नजरा खिळलेल्या आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+