5 Best Short Speeches for Republic Day 2026 : प्रजासत्ताक दिनानिमित्त 5 सोपी आणि प्रभावी भाषणे!
5 Best Short Speeches for Republic Day 2026 in Marathi : भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच 'प्रजासत्ताक दिन' अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. २६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले महान संविधान मिळाले आणि भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक राष्ट्र बनले. शाळा, महाविद्यालये आणि सोसायट्यांमध्ये या दिवशी भाषणांची मोठी रेलचेल असते. पण ऐनवेळी काय बोलावे आणि भाषणाची सुरुवात कशी करावी, असा प्रश्न अनेकांना पडतो.
...म्हणूनच, विद्यार्थ्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना सहज पाठ होतील अशी ५ अतिशय प्रभावी आणि प्रेरणादायी 'मराठी भाषणे' आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग, आपल्या शब्दांनी या प्रजासत्ताक दिनी सर्वांची मने जिंकूया!

१. पहिले भाषण: प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व (शालेय विद्यार्थ्यांसाठी)
"सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्रांनो! आज २६ जानेवारी, आपला प्रजासत्ताक दिन. २६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशात 'संविधान' लागू झाले आणि भारत एक सार्वभौम राष्ट्र बनले. आजचा दिवस आपल्याला आपल्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देतो. चला तर मग, आपल्या महान देशाच्या रक्षणाची आणि प्रगतीची शपथ घेऊया. भारत माता की जय!"
२. दुसरे भाषण: क्रांतिकारकांना अभिवादन
"नमस्कार, आज आपण आपला ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. भारत देशाला लोकशाही राष्ट्र बनवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आणि संविधान निर्मात्यांनी आपले आयुष्य वेचले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हे आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. या पवित्र दिनी आपण आपल्या देशाला जगातील सर्वोत्तम देश बनवण्याचा संकल्प करूया. जय हिंद!"
३. तिसरे भाषण: संविधानाचा गौरव
"उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! संविधान म्हणजे केवळ नियमांचे पुस्तक नाही, तर तो प्रत्येक भारतीयाचा सन्मान आहे. समानता, बंधुता आणि न्याय ही आपल्या संविधानाची मुख्य मूल्ये आहेत. एक आदर्श नागरिक म्हणून आपण संविधानाचा आदर राखला पाहिजे. 'सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा' या ओळींनुसार आपण देशाची एकता टिकवून ठेवूया. धन्यवाद!"
४. चौथे भाषण: तरुणांची जबाबदारी
"जय हिंद मित्रांनो! आज २६ जानेवारी. आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, देशाचे भविष्य तरुणांच्या हातात आहे. केवळ झेंडा वंदन करणे म्हणजे देशप्रेम नाही, तर देशाला स्वच्छ ठेवणे, नियमांचे पालन करणे आणि शिक्षणाद्वारे प्रगती करणे हे खरे देशप्रेम आहे. आपण सर्व मिळून भारताला महासत्ता बनवूया. वंदे मातरम!"
५. पाचवे भाषण: अतिशय छोटे भाषण (लहान मुलांसाठी)
"आज २६ जानेवारी, आमचा प्रजासत्ताक दिन! आमच्या देशाचे नाव भारत आहे. आम्ही सर्व भारतीय आहोत. मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे. भारत माता की जय! धन्यवाद."












Click it and Unblock the Notifications