Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

World asthma day 2025 : दमा का होतो, हा आजार किती धोकादायक आहे? जाणून घ्या लक्षण आणि बचाव कसा करायचा

World asthma day 2025 : दमा हा असा आजार आहे जो माणसांना खूप नाजूक बनवतो. रोगप्रतिकारक शक्ती आणि ढगाळ हवामान यावर दम्याची कमी अधिक तीव्रता अवलंबून असते.

खासकरुन जेव्हा हवामान वादळी आणि ढगाळ हवामान असते तेव्हा दम्याच्या रुग्णांना श्वास घ्यायला खूप जास्त त्रास होतो आणि हे आरेग्याच्यादृष्टीने घातक असते. याला थंडरस्टाॅर्म अस्थमा असे म्हणतात, यादरम्यान, ज्यात ढगाळ वातावरण आणि वादळी वातावरणादरम्यान ही समस्या वाढते.

world asthma day 2025

सध्या महाराष्ट्रासह भारतात हवामान बदलत आहे. सध्या उन्हाळ्यातही पाऊस पडत आहे. 6 मे रोजी तर पाऊस आणि ढगाळ वातावरणात अनेकांना श्वासोच्छावासची समस्या जाणवताना दिसत आहे. अशा वातावरणात दम्याच्या रुग्णांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा : धक्कादायक! एकाच वेळी 10 जणांना HIV; आरोग्य विभागही हादरला, पोलिस तपासात 'हे' कारण आलं समोर

  • ज्यांना आधीच दमा किंवा इतर श्वसन समस्या आहेत त्यांच्यासाठी वादळ दम्यामुळे अधिक समस्या निर्माण होऊ शकतात.
  • धूळ, परागकण किंवा प्रदूषणाची अ‍ॅलर्जी असलेल्या लोकांसाठी हा ऋतू अधिक धोकादायक ठरू शकतो. हृदयरोगाने ग्रस्त रुग्ण, गर्भवती महिला आणि वृद्धांनी देखील अतिरिक्त काळजी घ्यावी.

तज्ञ काय म्हणतात?

Boldsky च्या वृत्तानुसार जयपूरच्या अस्थमा भवनातील फुफ्फुसतज्ज्ञ डॉ. वीरेंद्र सिंह म्हणतात की वादळाच्या वेळी हवेतील धूळ आणि सूक्ष्म कणांचे प्रमाण वाढते, जे फुफ्फुसांमध्ये प्रवेश करून ऍलर्जी किंवा दमा होऊ शकतो. अशा परिस्थितीत रुग्णांनी आधीच खबरदारी घ्यावी.

हेही वाचा : अवघ्या पंचवीस, तिसाव्या वर्षी हार्ट अटॅक का येतोय? हृदयविकार टाळण्यासाठी 'या' गोष्टी महत्वाच्या,वाचा

दम्याची लक्षणे

खोकला, विशेषतः रात्री किंवा सकाळी
घरघर किंवा श्वास घेण्यास त्रास होणे
छातीत जडपणा
श्वास घेण्यात अडचण
जलद श्वास घेणे

ही आहेत दम्याची कारणे..

दमा ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये विशिष्ट उत्तेजनांच्या संपर्कात आल्यावर वायुमार्ग अरुंद होतात.

अ‍ॅलर्जी निर्माण करणारे घटक: परागकण, धुळीचे कण, प्राण्यांचा कोंडा, बुरशी

श्वसन संक्रमण: सर्दी, फ्लू
हवामान : थंड वारा
काही पदार्थ आणि पेये: अल्कोहोल, कॅफिन
धूळ, धूर आणि इतर वायू प्रदूषण
अनुवांशिकता : काही लोकांना दमा होण्याची शक्यता जास्त असते.

ढगाळ, वादळी वातावरणात रुग्णांनी काय काळजी घ्यावी?

  • वादळाच्या वेळी बाहेर जाणे टाळा,आवश्यक असल्यास, मास्क घाला.
  • दम्याची औषधे नेहमी सोबत ठेवा.
  • वृद्ध आणि हृदयरोग्यांनी बाहेर जाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा असामान्य लक्षणे आढळत असतील तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+