Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

तुम्हाला वारंवार लघवीला जावे लागते का?, मग वेळीच सावध व्हा, अन्यथा 'या' आजारांचा करावा लागेल सामना!

मानवी शरीरात सातत्याने बदल होत असतात. खाण्या-पिण्याबरोबरच तुमच्या नित्य क्रिया देखील व्यवस्थित होत असतील तर तुम्हाला कोणत्याही आजाराचा धोका राहत नाही. परंतु, तुम्ही प्रवास करत आहात किंवा एखाद्या पार्टीत गेला आहात आणि त्यावेळी तुम्हाला वारंवार लघवी येत असेल तर तुम्हाला त्याचा त्रास होतो.

सुरुवातीला ही गोष्ट आपल्याला सामान्य वाटू लागते. कदाचित तुम्ही खूप पाणी प्यायले असेल किंवा थंडीचा परिणाम असू शकतो. परंतु, जर ही समस्या दररोज आणि सतत होत असेल, तर ती तुमच्या शरीरात सुरू असलेल्या एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते, हे अजिबात विसरता कामा नये.

काही मूत्ररोगतज्ज्ञ यांच्या युट्युब चॅनलवरील माहितीचा विचार केला तर, वारंवार लघवीला जाण ही सामान्य शारीरिक प्रक्रियेचा भाग असू शकते, परंतु जेव्हा ती सवय बनते आणि तुम्हाला दिवसा तसेच रात्री शांत देखील झोपू देत नाही. तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणे भविष्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. त्यामुळे भविष्यात या समस्यांना सामोरे जावे, असा दावा देखील काही तज्ज्ञांनी केलेला आहे. ती कोणती लक्षणे असू शकतात, यावर आपण एक नजर टाकूया..!

Why do you have to urinate frequently

..तर तुम्हाला मधुमेह होऊ शकतो!

जर तुम्ही वारंवार लघवी करत असाल आणि खूप तहान लागली असेल, तर ते मधुमेहाचे लक्षण असू शकते. या स्थितीत, शरीर लघवीद्वारे जास्त ग्लुकोज बाहेर टाकते, ज्यामुळे लघवीचे प्रमाण आणि वारंवारता वाढते.

मूत्रमार्गाचा संसर्ग

महिलांमध्ये वारंवार लघवी होण्याचे एक सामान्य कारण म्हणजे यूटीआय. या संसर्गामध्ये, लघवी करताना जळजळ होते आणि लघवीचे प्रमाण कमी असले तरीही वारंवार लघवी करण्याची इच्छा होते. परंतु, प्रत्यक्षात लघवी होत नाही.

अतिक्रियाशील मूत्राशय

ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये मूत्राशय पूर्णपणे भरलेले नसले तरीही वारंवार आकुंचन पावते. यामुळे, लघवी करण्याची इच्छा अचानक आणि तीव्र होते.

प्रोस्टेट ग्रंथीच्या समस्या

मोठ्या प्रोस्टेट ग्रंथीमुळे मूत्रमार्गावर दबाव येऊ शकतो, ज्यामुळे लघवीचा पूर्ण प्रवाह रोखला जातो आणि व्यक्तीला वारंवार लघवी करण्याची गरज भासते. त्यामुळे भविष्यात प्रोस्टेट ग्रंथीच्या समस्या उद्भवतात.

गर्भधारणा

महिलांमध्ये गर्भधारणेदरम्यान, गर्भाशय मूत्राशयावर दबाव आणतो, ज्यामुळे वारंवार लघवी होते. जरी ही एक सामान्य स्थिती असली तरी, परंतु जर ती आवश्यकतेपेक्षा जास्त वाढली तर त्याची तपासणी करणे आवश्यक आहे.

डॉक्टरांकडे कधी गेले पाहिजे?

जेव्हा वारंवार लघवी करताना जळजळ होते, लघवीमध्ये रक्त किंवा असामान्य रंग दिसून येतो. तीव्र तहान आणि जलद वजन कमी होणे तसेच रात्री अनेक वेळा लघवी केल्याने झोपेत व्यत्यय येतो, अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला जरूर घेणे गरजेचे आहे. युरॉलॉजिस्टला सल्ला घेतल्यास ते योग्य ते मार्गदर्शन करतात.

उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय काय करावे?

तुमच्या साखरेची पातळी नियमितपणे तपासावी. जास्त पाणी पिणे आणि खूप कमी पाणी पिणे टाळावे. शौचालयात जाण्यास उशीर करू नका, कॅफिन आणि अल्कोहोल टाळले पाहिजे. विशेषतः गुप्तांगांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+