Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पोट दुखतयं सहज घेऊ नका! स्टमक कँन्सरच्या या 5 गंभीर लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका

Stomach Cancer Early Warning Signs : आजकाल पोटाचे विकार खूप सामान्य झाले आहेत, जसे की गॅस, अपचन किंवा पोट फुगणे, मात्र, अनेकदा या सामान्य लक्षणांच्या मागे 'गॅस्ट्रिक कॅन्सर' किंवा पोट (जठर) कर्करोगाचा धोका दडलेला असतो. पोटाचा कर्करोग हळूहळू वाढत असल्याने सुरुवातीला त्याची लक्षणे अगदी साधी वाटतात, ज्यामुळे वेळेवर निदान होणे कठीण होते आणि ही स्थिती प्राणघातक ठरू शकते.

नोव्हेंबर महिना जगभरात 'पोट कर्करोग जागरूकता महिना' म्हणून साजरा केला जातो. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पोट कर्करोगाची ५ महत्त्वपूर्ण प्रारंभिक लक्षणे जाणून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून वेळेत उपचार घेऊन रुग्णाचा जीव वाचवता येईल.

Stomach Cancer Early Warning Signs

पोट कर्करोगाची ५ गंभीर प्रारंभिक लक्षणे (Early Signs of Stomach Cancer)

पोट कर्करोग अर्थात जठर कर्करोग झाल्यावर पोटातील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात आणि गाठीचे रूप घेतात. खालील ५ लक्षणांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

१. पोटात सतत वेदना आणि सूज (Stomach Pain and Swelling)

  • पोट कर्करोग झाल्यास व्यक्तीला पोटात सतत तीव्र वेदना आणि सूज जाणवते. पोटाच्या वरच्या भागात जास्त होतात.
  • गाठीचा आकार वाढत जातो, तसतशी वेदनेची तीव्रताही वाढू शकते. जर वारंवार पोटात दुखत असेल, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

२. ब्लोटिंग आणि सारखे ढेकर येणे

  • पोटात कर्करोग झाल्यावर आतल्या थराची रचना बदलते, ज्यामुळे गॅस अडकतो आणि सतत पोट फुगल्यासारखे वाटते.
  • यासोबतच सतत ढेकरं येण्याची समस्या जाणवते. जर तुम्हाला नेहमी पोट भरल्यासारखे किंवा जड वाटत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

३. मळमळ आणि उलट्या होणे (Nausea and Vomiting)

  • कोणत्याही स्पष्ट कारणामुळे नेहमी मळमळ होणे किंवा उलट्या येणे हे देखील पोट कर्करोगाचे लक्षण असू शकते.
  • पचनात बिघाड झाल्यामुळे हे घडते. कर्करोग जसजसा वाढत जातो, तसतशी ही लक्षणे अधिक गंभीर रूप धारण करतात.

४. छातीत जळजळ आणि ॲसिडिटी (Heartburn and Acidity)

  • जेवणानंतर छातीत सतत जळजळ होणे किंवा ॲसिड रिफ्लक्स म्हणजेच ॲसिडिटीची समस्या कायम राहणे, हे देखील धोक्याचे संकेत आहे.
  • कर्करोगामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो, ज्यामुळे छातीत सतत जळजळ आणि वेदना जाणवते.

५. मलातून रक्त येणे (Blood in Stool)

  • पोट कर्करोग झाल्यास मलातून रक्त (Blood in Stool) येण्याची समस्या होऊ शकते.
  • हे रक्त गडद रंगाचे किंवा लाल रंगाचे असू शकते. हे लक्षण अत्यंत गंभीर असून याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये आणि त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.

जागरूक राहा अन् वेळीच प्रतिबंध करा

पोट कर्करोग हळू हळू वाढत असल्याने, त्याची प्रारंभिक लक्षणे ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला यापैकी कोणतेही लक्षण दीर्घकाळ जाणवत असेल, तर ते साधे अपचन नसून कर्करोगाचे संकेत असू शकतात. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य तपासणी, एंडोस्कोपी केल्यास या जीवघेण्या आजारावर मात करता येऊ शकते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+