Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सेक्स टॉयज शेअर करत असाल तर सावधान! ..तुमचा जोडीदार तुम्हाला 'हे' धोकादायक आजार देऊ शकतो

Sex toys use Benefits and harms : आजकाल बरेच लोक त्यांचे सेक्स लाईफ अधिक रोमांचक बनवण्यासाठी सेक्स टॉईज वापरतात, पण या साधनांच्या वापरामुळे काही आरोग्याशी संबंधित हानी देखील होऊ शकते. सर्वात मोठा धोका संसर्गाचा आहे, कारण लैंगिक खेळणी योग्य प्रकारे स्वच्छ न केल्यास, जिवाणू आणि बुरशीचा धोका वाढू शकतो.

सेक्स टाॅईज जर स्वच्छ नसेल तर यामुळे त्या भागात संसर्ग होऊ शकतो. याव्यतिरिक्त, जर सेक्सटॉईज चांगल्या दर्जाची नसतील किंवा हलक्या प्रतीची बनलेली असतील तर त्यामुळे ऍलर्जी आणि त्वचेची जळजळ होऊ शकते. सेक्सटॉईज जास्त किंवा असुरक्षितपणे वापरल्याने देखील शारीरिक समस्या उद्भवू शकतात, जसे की वेदना आणि त्वचेला तडे जाणे म्हणून, त्यांचा वापर काळजीपूर्वक आणि चांगल्या दर्जाच्या उत्पादनांसह केला पाहिजे.

sex toys use Benefits and harms

सेक्स टॉयई म्हणजे काय?

सेक्सटॉयजमध्ये विविध वस्तूंचा समावेश होतो, जसे की डिल्डो, व्हायब्रेटर, बट प्लग, हँडकफ, रोलप्लेचे पोशाख, चाबूक इत्यादी हे शारीरिक संबंधांदरम्यान वापरले जातात, जे शारीरिक आणि मानसिक आनंद वाढवण्यास मदत करतात. विशेषत: अविवाहित लोक किंवा ज्यांना जोडीदार नाही ते सेक्स टॉईज जास्त वापरतात. या खेळण्यांचा उपयोग मूड उत्तेजित करण्यासाठी, शारीरिक समाधान वाढवण्यासाठी आणि लैंगिक अनुभव अधिक रोमांचक बनवण्यासाठी केला जातो. ते योग्य आणि सुरक्षितपणे वापरणे महत्वाचे आहे.

सेक्सटॉयच्या वापरामुळे आरोग्याशी संबंधित अनेक हानी होऊ शकते.

संसर्गाचा धोका

लैंगिक खेळणी (सेक्स टाॅईज) व्यवस्थित स्वच्छ न केल्यास संसर्गाचा धोका वाढतो. जर शरीरातील द्रवपदार्थ योग्य प्रकारे स्वच्छ केले गेले नाहीत तर ते लैंगिक संक्रमणास कारणीभूत ठरू शकतात.

एचआयव्हीचा धोका

सेक्सटॉयच्या सामायिक वापरामुळे एचआयव्ही, एड्स सारख्या लैंगिक संक्रमित रोगांचा धोका वाढू शकतो. म्हणून, तुम्ही तुमची सेक्सटॉईज कधीही इतरांसोबत शेअर करू नका आणि ती व्यवस्थित साफ केल्यानंतरच वापरा.

जळजळ आणि सूज

सेक्सटॉईज हे वेगवेगळ्या मटेरियलपासून बनवलेले असून, त्यांचा वापर केल्यास ऍलर्जी होऊ शकते. यामुळे ज्या भागात सेक्स टाॅईज वापरत आहात तिथे जळजळ, सूज आणि लालसरपणा होऊ शकतो.

कर्करोगाचा धोका वाढवतो..!

काही अभ्यास असे सूचित करतात की, सेक्सटॉय बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीमध्ये कार्सिनोजेनिक गुणधर्म असू शकतात. सेक्सटॉईजचा नियमित वापर केल्यास कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका वाढू शकतो. जखमा निर्माण करणे, बट प्लग आणि डिल्डोसारखे सेक्सटॉईज काहीवेळा शरीरात अडकू शकतात, ज्यांना काढण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांची गरज भासू शकते. यामुळे अंतरंग भागात जखमा होऊ शकतात.

लैंगिक संवेदना कमी होणे

व्हायब्रेटरच्या सततच्या वापरामुळे त्या पार्टमध्ये संवेदनशीलता कमी होऊ शकते, ज्यामुळे शारीरिक संबंधादरम्यान संवेदना नष्ट होऊ शकतात. समाधानकारक अनुभव असू शकत नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+