Secondary Infertility : महिलांना दुसऱ्यांदा आई होण्यास अडचण का येत आहे; काय आहे कारणं? जाणून घ्या
Secondary Infertility : लग्न होतात, पहिला पाळणा हलतो, बाळ घरात येते अन् आनंदाला पारावार उरत नाही, पण नंतर दुसऱ्यांदा आई व्हावेसे वाटते, तेव्हा गर्भधारणा होत नाही किंवा मोठी अडचण येते, याला दुय्यम वंध्यत्व म्हणतात. ही समस्या स्त्री किंवा पुरुष दोघांपैकी एकामुळे होऊ शकते. महिलांमध्ये त्याची प्रमुख कारणे आहेत आणि अनेक जोडपे या समस्येने सध्या चिंतेत आहेत.
स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मते दोन वर्षांनंतर पहिल्या मुलासाठी प्रयत्न केले, परंतु ते दुसऱ्या मुलांसाठी सहा-सात वर्षांपासून प्रयत्न करत आहेत, पण गर्भधारणेला समस्या येत आहेत, या परिस्थितीमुळे मानसिक ताण येऊ शकतो, म्हणून वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे आणि योग्य उपचार घेणे खूप महत्वाचे आहे.

दुय्यम वंध्यत्वाची कारणे काय?
एका संशोधनानुसार, जर एखाद्या जोडप्याने पहिल्या आणि दुसऱ्या मुलामध्ये पाच वर्षांपेक्षा जास्त अंतर ठेवले तर महिलेच्या अंडकोषाची गुणवत्ता कमी होऊ लागते, ज्यामुळे गर्भधारणेत समस्या निर्माण होऊ शकतात. याशिवाय, एंडोमेट्रिओसिस हे देखील एक प्रमुख कारण आहे, ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये गर्भाशयाच्या बाहेरील इतर पुनरुत्पादक अवयवांमध्ये गर्भाशयाचे अस्तर विकसित होऊ लागते. यामुळे ट्यूबल ब्लॉकेज किंवा डिम्बग्रंथि सिस्टची समस्या उद्भवते, जी गर्भधारणेत अडथळा आणते.
आणखी काय आहेत दुसऱ्या गर्भधारणेच्या समस्या..
वाढते वय, खराब जीवनशैली, संप्रेरकाचे (हार्मोनल) असंतुलन, अंडाशयातील समस्या आणि पुरुषांमध्ये कमकुवत शुक्राण, पुर्वी झालेला गर्भपात किंवा जीवनशैलीतील समस्या याही देखील दुय्यम वंध्यत्वास कारणीभूत ठरू शकतात. अशा परिस्थितीत, वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
दुसऱ्यांदा मुल होत नाही याचे प्रमाण किती?
एका संशोधनानुसार, जगातील सुमारे 20 टक्के जोडप्यांना दुसऱ्या मुलासाठी प्रयत्न करताना गर्भधारणा होत नाही, याच समस्येला दुय्यम वंध्यत्व म्हणतात. वेळेवर योग्य डॉक्टरांशी संपर्क साधून आणि अचूक उपचारांनी हे सोडवणे शक्य आहे आणि महिला दुसऱ्यांदा आई बनण्यात यशस्वी होऊ शकतात.
दुय्यम वंध्यत्वाचा उपचार
- दुय्यम वंध्यत्वाची समस्या जरी उद्धवली तरीही अती ताण घेऊ नका.
- दुय्यम वंध्यत्वाच्या समस्येवर उपचार करता येतात.
- समस्येच्या कारणावर यासंबंधीचे उपचार अवलंबून असतात.
- क्लोमिफेन सायट्रेट सारखी प्रजनन औषधे अंडी उत्पादन वाढवण्यास मदत करतात, परंतु ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
या समस्येवर काय आहे आधुनिक तंत्रज्ञान..
आधुनिक तंत्रांपैकी इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) ही मुख्य आहे, यामध्ये गर्भधारणेची प्रक्रिया प्रयोगशाळेत अंडी आणि शुक्राणूंचे मिश्रण करून केली जाते. त्याचवेळी, शुक्राणूंची गुणवत्ता किंवा संख्या कमी असलेल्या प्रकरणांमध्ये इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन (ICSI) उपयुक्त आहे.
या गोष्टीचा अंगिकार करा...
- जर तुमची जीवनशैली चुकीची असेल तर त्यात लगेच बदल करणे आवश्यक आहे.
- जंक आणि फास्ट फुड टाळून योग्य सकस आहार घ्यायला हवा.
- मानसिक ताण-तणाव टाळावा, ताणाचे व्यवस्थापन आणि नियमित व्यायाम देखील उपचारांसाठी आवश्यक आहेत.
- योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेतल्याने यश मिळण्याची शक्यता वाढू शकते.












Click it and Unblock the Notifications