पुणेकरांनो काळजी घ्या, गिलेन-बॅरे सिंड्रोमच्या आतापर्यंत 197 रुग्ण, हा आजार किती धोकादायक ?
Pune GBS Disease : पुणे शहरात मागील काही दिवसांपासून दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार 'गुइलेन बॅरे सिंड्रोम' (GBS) रुग्णांची संख्या वाढत आहे आहे. पुणे परिसरात गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या संशयित आणि पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या आता 197 वर पोहोचली आहे. पुण्यात ही रुग्णसंख्या वाढत असून हे चिंतेचे कारण बनले आहे.
गुइलेन बॅरे सिंड्रोमचे आणखी पाच रुग्ण पुणे शहरात आढळून आले आहेत. मिळालेल्या माहीतीनुसार पुण्यातील पाच रुग्णांमध्ये दोन नवीन रुग्ण आणि मागील दिवसातील तीन रुग्णांचा समावेश आहे. देशात आतापर्यंत या आजाराने एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाच्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, 197 प्रकरणांपैकी 172 जणांवर जीबीएससाठी उपचार करण्यात आले. सुमारे 40 रुग्ण पुणे महानगरपालिका क्षेत्रातील आहेत.पीएमसी परिसरातील नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील 92, पिंपरी चिंचवड महानगर पालिका परिसरातील 29, पुणे ग्रामीणमधील 28 आणि 8 रुग्ण इतर जिल्हातील आहेत.
काय आहे हा आजार?
GBS मध्ये शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा चुकून मज्जासंस्थेवर हल्ला करते, ज्यामुळे स्नायू कमकुवत होणे, सुन्न होणे आणि कधीकधी अर्धांगवायू यांसारखी लक्षणे दिसतात. चला जाणून घेऊया हा आजार किती धोकादायक आहे?
गुइलेन बॅरे सिंड्रोम गुइलेन बॅरी सिंड्रोम म्हणजे काय?
गुइलेन बॅरी सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मिळ आणि गंभीर स्वयंप्रतिकार विकार आहे. ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा चुकून परिधीय नसावर हल्ला करते. या हल्ल्यामुळे सूज येते आणि मज्जातंतूंना नुकसान होते, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात, मुंग्या येणे, सुन्न होणे आणि कधीकधी गंभीर प्रकरणांमध्ये श्वास घेण्यास त्रास होतो.
या आजाराचे नेमके कारण काय?
-या आजाराचे नेमके कारण अद्याप ज्ञात नाही, परंतु सामान्यतः हा विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गासारख्या संसर्गानंतर विकसित होतो.
-फ्लू, डेंग्यू किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शननंतर अनेक प्रकरणांमध्ये GBS आढळून आले आहे. यानंतर रुग्णांनी लगेच डाॅक्टरांचा सल्ला घेणे अपेक्षित आहे. कारण योग्य उपचाराने रुग्णाची स्थिती सुधारते.
-गुइलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) ची लक्षणे
- गुइलेन बॅरी सिंड्रोम (GBS) च्या प्रमुख लक्षणांमध्ये स्नायूंमध्ये अचानक कमजोरी
- विशेषत: पाय आणि हातांमध्ये मुंग्या येणे किंवा सुन्न होणे यांचा समावेश होतो.
- रुग्णाला संतुलन राखण्यात आणि चालण्यात अडचण येऊ शकते.
- गंभीर प्रकरणांमध्ये, श्वास घेण्यात अडचण, जलद हृदयाचे ठोके आणि रक्तदाबात बदल देखील दिसून येतात.
- ही लक्षणे वेगाने वाढू शकतात, ज्यामुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते. वेळेवर उपचार करून लक्षणे नियंत्रित करता येतात.
- Guillain Barrie सिंड्रोम (GBS) वर त्वरित आणि काळजीपूर्वक उपचार आणि व्यवस्थापित केले पाहिजे.












Click it and Unblock the Notifications