दुसऱ्या गर्भधारणेलाही 'मातृ वंदना' योजनेचा लाभ मिळतो का?, जाणून घ्या नवे नियम अन् संपूर्ण प्रक्रिया!
PM Matru Vandana Yojana Eligibility Rules Explained : भारत सरकारने देशभरातील महिलांच्या आरोग्याला आणि त्यांना आर्थिक बळ देण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या आहेत. यापैकीच एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY).

आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गर्भवती महिलांना आणि नवजात बालकांना पोषण आणि आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
पूर्वी ही योजना प्रामुख्याने पहिल्या मुलाच्या जन्मासाठी केंद्रित होती, पण आता सरकारने यामध्ये मोठा बदल केला आहे. अनेक महिलांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर या नियमामध्ये बदल झाला आहे. दुसऱ्यांदा गर्भधारणेलाही या योजनेचा फायदा मिळतो, परंतु त्यासाठी काही विशिष्ट अटी टाकण्यात आलेल्या आहेत, जाणून घ्या त्याविषयी सर्व काही एकाच क्लीकवर.
पहिल्या मुलासाठी 'मातृ वंदना' योजनेचे बदललेले नियम
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत पहिल्या मुलाच्या जन्मासाठी सरकार ₹५,००० ची आर्थिक मदत करते. पूर्वी ही रक्कम तीन टप्प्यांमध्ये दिली जात होती, मात्र आता नियमात बदल झाला आहे:
- टप्पा पूर्वीची रक्कम (एकूण ₹५,०००)
- पहिला हप्ता ₹३,०००
- दुसरा हप्ता ₹२,०००
- एकूण रक्कम ₹५,०००
दुसऱ्या अपत्यासाठी ₹६,००० चा विशेष लाभ!
योजनेत करण्यात आलेल्या सुधारणांनुसार, दुसऱ्यांदा आई होणाऱ्या महिलांनाही आता लाभ दिला जाणार आहे. पण यासाठी सरकारने एक महत्त्वाची अट ठेवली आहे. ती अट म्हणजे दुसरे मूल 'मुलगी' असल्यास या योजनेचा लाभ मिळेल.
जर दुसरे अपत्य मुलगी असेल, तर सरकारकडून ₹६,००० चे प्रोत्साहन म्हणून दिले जातील. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या माहितीनुसार, हा बदल माता आणि बालकांच्या आरोग्याबरोबरच लिंग गुणोत्तर सुधारण्यास मदत करेल.
दुसऱ्या मुलीसाठी नोंदणीचे नियम!
दुसऱ्या मुलीसाठी लाभ मिळवण्यास इच्छुक असलेल्या महिलांसाठी सरकारने वेळ मर्यादा निश्चित केली आहे.
जन्माची वेळ मर्यादा
दुसरे मूल (मुलगी) जन्माला आल्यानंतर २७० दिवसांच्या आत तिची नोंदणी करणे आवश्यक आहे. जर दुसरी मुलगी १ एप्रिल २०२५ नंतर जन्माला आली असेल, तर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत यासाठी अर्ज करता येतील.
योजनेसाठी अर्ज प्रक्रिया
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना सर्वप्रथम अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जाशिवाय कोणताही निधी मिळणार नाही.
नवीन पोर्टल
- नोंदणी प्रक्रिया आता नवीन अधिकृत पोर्टलद्वारे केली जाईल. (https://pmmvy.wcd.gov.in/)
- अर्ज प्रक्रियेदरम्यान सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
- अर्ज पडताळणी आणि मंजूर झाल्यानंतरच लाभ उपलब्ध होतील आणि रक्कम थेट बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.
या सुधारणांमुळे, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आता अधिक व्यापक झाली आहे, ज्यामुळे दुसऱ्या मुलीच्या जन्मास प्रोत्साहन मिळून महिलांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
-
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
पुरुषांनो, 'या' 5 सामान्य लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; असू शकतो वाढलेल्या प्रोस्टेटचा धोका! -
वयाच्या 30व्या वर्षीच विसरभोळेपणा वाढलाय? सावधान 'ब्रेन' हा आजार असू शकते, जाणून घ्या लक्षणे -
संभाजीनगरात पंचायत समिती निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा; अंबादास दानवेंचा भाजप उमेदवारावर हल्ला







Click it and Unblock the Notifications