Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

National Cancer Awareness Day 2024 :कोणालाही होऊ शकतो कर्करोग, हे आहेत 3 प्रमुख कारणे

National Cancer Awareness Day 2024 : कर्करोग प्रतिबंध लवकर निदान आणि उपचारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतात दरवर्षी 7 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस साजरा करतो. 2014 मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची सुरुवात केली होती.

जगभरात कॅन्सर ही झपाट्याने वाढणारी समस्या बनली आहे. कर्करोगामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. यापैकी बरेच कर्करोग टाळता येण्यासारखे आहेत. यासाठी लहानपणापासूनच सतत प्रयत्न करावे लागतात, असं आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्यांच्या कुटुंबात आधीच कॅन्सर आहे अशा लोकांनी आणखी सावध व्हायला हवं.

National Cancer Awareness Day 2024

आपल्या दैनंदिन जीवनात आणि खाण्याच्या सवयींमध्ये अनेक चुकीच्या सवयी आहेत. ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. प्रत्येकाने याबाबत जागरूक राहिले तर कर्करोगापासून बचाव करणे सोपे होऊ शकतं, असं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणे आहे. कर्करोगासाठी कोणती कारणे जबाबदार मानली जातात ते आपण जाणून घेऊया?

कर्करोगाचा धोका

आपण आपली जीवनशैली सुधारली तरी कर्करोगाचा धोका बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो, असं कर्करोग तज्ञांचं म्हणणं आहे. काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की, वाढत्या वयानुसार कर्करोगाचा धोका वाढतो, जरी लहान मुले देखील त्याचा बळी होऊ शकतात. याशिवाय, धूम्रपान, जास्त वजन, आहारातील व्यत्यय, शारीरिक निष्क्रियता यासारख्या जीवनशैलीतील घटक देखील धोका वाढवू शकतात.

तंबाखू आणि मद्य सेवन

धूम्रपान हे कर्करोगाचे प्रमुख कारण मानले जाते.धूम्रपान हे 80-90% फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या मृत्यूसाठी ते जबाबदार आहे. तंबाखूच्या धुरात कार्सिनोजेन्स असतात जे पेशींमधील डीएनए खराब करतात. ज्यामुळे उत्परिवर्तन आणि अनियंत्रित पेशींची वाढ होते. त्याचप्रमाणे, अल्कोहोलचे जास्त किंवा नियमित सेवन केल्याने यकृत, अन्ननलिका आणि कोलोरेक्टल कर्करोगासह विशिष्ट प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

शारीरिक निष्क्रियता टाळा

शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करणे सर्वात महत्त्वाचं आहे. जे लोक व्यायाम करत नाहीत किंवा शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय आहेत. त्यांच्यामध्ये कर्करोगाचा धोका देखील वाढताना दिसत आहे. शारीरिक निष्क्रियतेमुळे वजन वाढू शकते. जास्त वजन किंवा लठ्ठपणाचा कर्करोगाच्या जोखमीशी संबंध जोडला आहे.

आहारातील व्यत्यय

काही प्रकारच्या आहारामुळे कर्करोगाचा धोका वाढतो असेही आढळून आले आहे. विशेषकरुन लाल आणि प्रक्रिया केलेले मांस खाल्ल्याने कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका वाढू शकतो. या मांसामध्ये नायट्रेट्स सारखी कार्सिनोजेनिक संयुगे असतात, ज्यामुळे आतड्याच्या अस्तरांना नुकसान होऊ शकते.काही अभ्यासांमध्ये जास्त चरबीयुक्त आहार हानीकारक असल्याचे देखील दिसून आले आहे. त्याचप्रमाणे, साखरेचे प्रमाण जास्त असलेले आहार शरीरात जळजळ वाढवू शकते ज्यामुळे कर्करोगासह अनेक रोग होऊ शकतात.

टीप : ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या गृहीतकांवर आणि माहितीवर आधारित आहे. Oneindia Marathi लेखाशी संबंधित कोणतेही इनपुट किंवा माहिती सत्यापित करत नाही. कृपया कोणतीही माहिती आणि गृहितके कृती करण्यापूर्वी किंवा अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+